Get it on Google Play
Download on the App Store

वसलसुत्तं 2

एकजं वा द्विजं वा पि योध पाणानि हिंसति |
यस्स पाणे दया नत्थि तं जञ्ञा वसलो इति ||२||


जरायुज किंवा अंडज प्राण्यांचा जो वध करतो, ज्याला प्राण्यांची दया नसते, त्याला वृषल समजावें ||२||

यो हन्ति परिरुन्धति गामानि निगमानि च|
निग्गाहको समञ्ञातो तं जञ्ञा वसलो इति ||३||


जो गांवे आणि शहरें वेढतो, उध्वस्त करतो, ज्याला लोक लुटारू म्हणून ओळखतात, त्याला वृषल समजावें ||३||

गामे वा यदि वा रञ्ञे यं परेसं ममायितं |
थेय्या अदिन्नं आद्यिति तं जञ्ञा वसलो इति ||४||


गांवांत किंवा अरण्यांत इतरांनी आपली मानलेली वस्तु जो चोरतो, त्याला वृषल समजावें ||४||

यो हवे इणमादाय चुज्जमानो पलायति |
नहि ते इणमत्थी ति तं जञ्ञा वसलो इति ||५||

जो ऋण घेऊन तें परत मागितलें असतां तुझें मी देणेंच नाहीं असें म्हणून पळ काढतो, त्याला वृषल समजावें ||५||

यो वे किञ्चिक्खकम्यता पन्थस्मिं वजतं जनं |
हन्त्वा किञ्चिक्खमादेति तं जञ्ञा वसलो इति ||६||

जो ह्या किंवा त्या पदार्थांच्या इच्छेने वाटेंत लोकांना ठार मारून त्यांच्या जवळच्या वस्तू हिरावून घेतो, त्याला वृषल समजावे ||६||

यो अत्तहेतु परहेतु धनहेतु च यो नरो |
सक्खिपुट्टो मुसा ब्रूति तं जञ्ञा वसलो इति ||७||


आपणासांठी, दुस-यासांठी किंवा पैशासाठी जो खोटी साक्ष देतो, त्याला वृषल समजावें ||७||

जो ञातीन सखानं वा दारेसु पतिदिसति |
सहसा सम्पियेन वा तं जञ्ञा वसलो इति ||८||


जो जबरदस्तीनें किंवा प्रेमानें आपल्या आप्तइष्टांच्या स्त्रियांशी संबंध ठेवतो, त्याला वृषल समजावें ||८||