Get it on Google Play
Download on the App Store

सत्तबोज्झंगसुत्तं

सत्तबोज्झंगसुत्तं

एवं मे सुतं | एकं समयं भगवा राजगहे विहरति वेळुवने कलन्दकनिवापे | तेन खो पन समयेन आयस्मा महाकस्सपो पिप्फलिगुहांय विहरति अबाधिको दुक्खितो बाळ्हगिलानो अथ खो भगवा सायण्हसमयं पटिसल्लाना वुट्ठितो येनायस्मा महाकस्सपो तेनुपसंकमि | उपसंकमित्वा पञ्ञत्ते आसाने निसीदि || निसज्ज खो भगवा आयस्मन्त महाकस्सपं एतदवोच | कच्चि ते कस्सप खमनीयं कच्चि यापनीयं कच्चि दुक्खा वेदना पटक्कमन्ति  नो अभिक्कमन्ति | पटिक्कमोसानं पञ्ञायति नो अभिक्कम्मो ति || न मे भन्ते खमनीयं न यापनीयं | बाळहा मे दुक्खा वेदना अभिक्कमन्ति नो पटिक्कमन्ति | अभिक्कमोसानं पञ्ञायति न पटिक्कमो ति || सत्तिमे कस्सप बोज्झंगा मया सम्मदक्खाता भाविता बहुलीकता अभिञ्ञाय संबोधाय निब्बनाय संवत्तन्ति | कतमे सत्त सतिसंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || धम्मविचयसंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभि़ञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || विरियसंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || पीतिसंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || पस्सद्धिसंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || समाधिसंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || उपेक्खासंबोज्झंगो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तति || इमे खो कस्सप सत्त बोज्झंगा मया सम्मदक्खात भाविता बहुलिकता अभि़ञ्ञाय संबोधाय निब्बानाय संवत्तन्ती ति || तग्ध भगवा बोज्झंगा तग्ध सुगत बोज्झंगा ति || इदमवोच भगवा | अत्तमनो आयस्मा महाकस्सपो भगवत्तो भासितं अभिनन्दि || वुठ्ठहि चायस्मा महाकस्सपो तम्हा आबाधा || तथा पहीनो चायस्मतो महाकस्सपस्स सो आबाधो अहोसी ति ||


असें मी ऐकलें आहे | एके समयीं भगवान् राजगृह येथें वेणुवनांत कलंदकनिवापांत राहत होता || त्या समयीं आयुष्यमान् महाकाश्यप पिप्फलिगुहेंत राहत होता, व तो फार आजारी होता || तेंव्हा भगवान् संध्याकाळीं ध्यानसमाधि आटपून आयुष्मान् महाकाश्यप होता तेथें गेला | तेंथें जाऊन मांडलेल्या आसनावर बसला || बसून भगवान् आयुष्मान महाकाश्यपाला म्हणाला | हे काश्यप, तुझें ठीक चाललें आहे ना ? दु:खकारक वेदना नाहींशा होत असून पुन: उत्पन्न होत नाहींत ना ? त्याचा नाश  तेवढा जाणवतो, पण उत्पत्ति जाणवत नाही ना? || (महाकाश्यप म्हणाला) भदन्त, माझें आरोग्य ठीक नाहीं |
तीव्र दु:खकारक वेदना मला उत्पन्न होत असून त्या नाहींशा होत नाहींत | त्यांची उत्पत्ति जाणवतो पण नाश जाणवत नाही. || (भगवान् म्हणाला) हे काश्यप, हीं मीं सात बोधीचीं (ज्ञानाचीं) अंगें उत्तम रीतीनें उपदेशिलीं आहेत | त्यांची भावना आणि अभिवृद्धि केली असतां ती अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणींभूत होतात | तीं सात कोणतीं? हे काश्यप, स्मृति ह्या संबोध्यंगाचा मी नीट उपदेश केला आहे | त्याची भावना व अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होंतें || हे काश्यप, धर्मप्रविचय ह्या संबोध्यंगाचा मी नीट उपदेश केला आहे | त्याची भावना व अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि नार्वाणाला कारणीभूत होतें || हे काश्यप, वीर्य ह्या अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होतें || हे काश्यप, प्रीति हया संबोध्यंगाचा मीं नीट उपदेश केला आहे |  त्याची भावना आणि अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होंतें || हे काश्यप, प्रिति ह्या संबोध्यंगाचा मीं नीट उपदेश केला आहे | त्याची भावना व अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होतें || हे काश्यप, प्रश्रब्धि ह्या संबोधाचा मी नीट उपदेश केला आहे | त्याची भावना व अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि नार्वाणाला कारणीभूत होतें || हे काश्यप, समाधि ह्या संबोध्यंगाचा मीं नीट उपदेश केला आहे | त्याची भावना व अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होतें || हे काश्यप, उपेक्षा ह्या संबोध्यंगाचा मी नीट उपदेश केला आहे | त्याची भावना व अभिवृद्धि केली, तर तें अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होतें || हीं सात बोध्यंगे मीं नीट उपदेशिलीं आहेत | त्यांची भावना आणि अभिवृद्धि केली असातां तीं अभिज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होतात. (महाकाश्यप म्हणाला) भगवान् किती चांगली बोध्यंगें, सुगत || किती चांगली बोध्यंगें || असें भगवन्ताला बोलता झाला | आयुष्यमान् महाकाश्यपाने भगवन्ताच्या भाषणाचें अभिनंदन केलें || आणि आयुष्यमान् महाकाश्यपाने भगवन्ताच्या भाषणाचें अभिनंदन केले || आणि आयुष्यमान महाकाश्यप त्या आजारांतून बरा झाला || याप्रमाणे आयुष्यमान् महाकाश्यपाचा तो आजार नष्ट झाला ||

||सत्तबोज्झंगसुत्तं निट्ठितं||