दाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...
दाणेदार शुभ्र मीठ दिसतं किती मोहक
चव मात्र असते अगदी खारट खारट
लालभडक मिरचीबाई किती तजेलदार
तिखटपणा असा की डोळ्यांना लागते धार
पिवळी पिवळी हळद कशी दिसते गोजिरवाणी
साखरेसारखी चिमूटभर खात नाही कुणी
मेथी, मोहरी, हिंग, जिरे यांचेही खास स्थान
पंचपाळ्यात बसण्याचा त्यांना मिळतो मान
केशरी रवाळ गूळ, चिंच हिरवी काळी
गोड आंबट चव त्यांची आगळी नि वेगळी
या सर्वांना घेऊन आई बनवते भेळ
तोंडाला सुटलं पाणी चला थांबवूया खेळ