Get it on Google Play
Download on the App Store

सांग मला रे सांग मला आई...

सांग मला रे सांग मला

आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी

तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !

आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई

शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !

आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही

चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !

आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही

मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !

आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी

मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !

आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते

तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !

आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती

कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !

आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी

रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !

आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !

बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !

आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा

म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !

आवडती रे वडिल मला !

गीत - ग. दि. माडगूळकर

बाल गीते - संग्रह १

संकलित
Chapters
सांग मला रे सांग मला आई... आई व्हावी मुलगी माझी ,... आईसारखे दैवत सा र्‍या ज... आणायचा, माझ्या ताईला नवर... रुसु बाई रुसु कोपर्‍यात ब... आला आला पाउस आला बघ... आली बघ गाई गाई शेजारच्या ... आवडती भारी मला माझे आजोबा... लहान सुद्धा महान असते ... इवल्या इवल्या वाळूचं , ... इवल्या इवल्याशा, टिकल्या-... उगी उगी गे उगी आभाळ... एक कोल्हा , बहु भुकेला ... उठा उठा चिऊताई सारीक... एक झोका चुके काळजाचा ठो... एक होता काऊ , तो चिमणी... एका तळ्यात होती बदके ... कर आता गाई गाई तुला... कशासाठी पोटासाठी खंडाळ्... काडकीच्या टोकावर ताणलाय... किलबिल किलबिल प क्षी बो... कोण येणार ग पाहुणे ... गमाडि गंमत जमाडि जंमत ... गोड गोजरी , लाज लाजरी ... चंदाराणी , चंदाराणी , का ... चांदोबा चांदोबा भागलास ... छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छ... ओळखणार ना बरोबर , ओळखा ... झुक झुक झुक झुक अगीनग... टप टप टप काय बाहेर व... टप्‌ टप्‌ पडती अंगावरत... टप टप टप टप टाकित टा... टप टप टप थेंब वाजती ,... ठाऊक नाही मज काही ! ... ताईबाई , ताईबाई ग , अत... तुझ्या गळा, माझ्या ग... तुझी नी माझी गंमत वहि... दिवसभर पावसात असून , सा... देवा तुझे किती सुंदर ... हासरा, नाचरा जरासा लाजर... हिरवी झाडी , पिवळा डोंगर ... करा रे हाकारा पिटा रे डां... उन्हामध्ये पावसाला रुपडं ... पिंपळगावी एक पोरगा मुलगा ... गाढवापुढे कोडे एकदा पडले ... किर्र रात्री सुन्न रात्र... एक होता राजा आणि एक होती ... कावळ्यांची शाळा रंग त्... सरळ नाक , गोरी पान , लाल ... झुंईऽऽ करीत विमान कसं ... धाड् धाड् खाड् खाड् च... खरं सांगू ? विदूषकच सर्व... विदूषकाचे हे डोळे किती... वाटी ठेविली चांदीची जेव्ह... दाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...