Get it on Google Play
Download on the App Store

देह मंदिर चित्‍त मंदिर एक...

देह मंदिर चित्‍त मंदिर एक तेथे प्रार्थना

सत्य-सुंदर-मंगलाची नित्य हो आराधना ॥

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना

वेदना जाणावया जागवू संवेदना

दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना

सत्य-सुंदर-मंगलाचि नित्य हो आराधना ॥

जीवनी चैतन्य राहो मानसी सद्‌भावना

सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना

धैर्य लाभो तेज लाभो सत्यता-संशोधना

सत्य-सुंदर-मंगलाचि नित्य हो आराधना ॥

जाळुनी वैषम्य सारे वैर सार्‍या वासना

मानवाच्या एकतेची मूर्त होवो कल्पना

मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना

सत्य-सुंदर-मंगलाची नित्य हो आराधना ॥

बाल गीते - संग्रह ३

संकलित
Chapters
समर्थ आहे भारतभूमी , समर्... आम्ही गीत तुझे गाऊ भा... विश्‍वशांतीचे अन् समतेच... तंत्र आणि विज्ञान युगातील... ते देशासाठी लढले ते अम... सैनिक आम्ही , आम्हां लाभल... कशासाठी ? पोटासाठी ? द... कण कण माझ्या तनुचा मिरवी ... उत्क्रांतीचा आज आम्हांला ... नमो मायभूमी , नमो पुण्यमा... पसरलाय सागर दूरवर पहा ... दरीत वसले गाव चिमुकले ... श्रीशिवबांची माय जिजाई मह... इथे गांधीजी राहात होते अ... आमुचे प्रणाम बाबांना ... चवदार तळ्याचे पाणी नव ... फुलाफुलांचा गंध वाहता वार... स्वातंत्र्याच्या संग्रामा... तात्या टोपे तात्या ... देह मंदिर चित्‍त मंदिर एक... सताड उघडा खिडक्या -दारे ,... सर्वात्मका शिवसुंदरा स... आकाशातुन पतंग काटले त्... आम्ही पाखरे मुठीत आमुच्या... भिऊन पावलं टाकू नका , भ... संपला अंधार हा झाली नवी प... पहा संपला तिमिर सर्व हा ... अणुरेणूतुनि शब्द प्रगटती ... दया गाणारे हात प्रभो ,...