Get it on Google Play
Download on the App Store

इथे गांधीजी राहात होते अ...


इथे गांधीजी राहात होते
अजूनही दिसताहेत त्यांच्या पावलांचे ठसे
मार्ग दाखवायला, मार्ग उजळायला
इथे नाहीत गांधीजींचे पुतळे
पण आहे त्यांच्या कामाची गाथा
इतिहासाला दिव्येतिहास करणारी
मानवाला महामानव बनवणारी.
गांधीजी होते -
सागरातले महासागर
पर्वतराजीतले हिमालय
वृक्षराजीतले वृक्षराज
आकाशातले चंद्र-सूर्य
त्यांनी तत्‍त्वज्ञान फक्‍त वाचले नव्हते,
तर ते पचवले होते.
सिद्‌धान्त मांडले नव्हते,
तर वर्तनात सिद्‌ध केले होते.
साधनशुचित्‍व सांगितले नव्हते,
तर कार्यान्वित केले होते.
वेदातील निसर्गशक्‍तिपूजा
भागवतातील भक्‍तिनिष्‍ठा
गीतेतील ज्ञान, योग, कर्म
सर्वधर्मीसमानत्व
यांचा संगम होता त्यांच्या जीवनात.
मृत्यूला ते घाबरले नाहीत
पण मृत्युंजयाचा अहंकार त्यांना नव्हता
शत्रूशी ते लढले पण
शत्रुत्व त्यांनी बाळगले नाही
त्यांचा द्‌वेष करणे त्यांच्या मनातही नव्हते.
जनतेला त्यांनी दिशा दाखविली
पण जनतेपासून ते दूर गेले नाहीत.
ते होते -
नम्रतेचे सागर
धर्माचे आगर
शांतीचे प्रेषित
स्वातंत्र्याचे आणि समतेचे सेनापती
युगप्रवर्तक
त्यांच्या पावलांचे ठसे सांगताहेत...
इथे गांधीजी राहात होते.

बाल गीते - संग्रह ३

संकलित
Chapters
समर्थ आहे भारतभूमी , समर्... आम्ही गीत तुझे गाऊ भा... विश्‍वशांतीचे अन् समतेच... तंत्र आणि विज्ञान युगातील... ते देशासाठी लढले ते अम... सैनिक आम्ही , आम्हां लाभल... कशासाठी ? पोटासाठी ? द... कण कण माझ्या तनुचा मिरवी ... उत्क्रांतीचा आज आम्हांला ... नमो मायभूमी , नमो पुण्यमा... पसरलाय सागर दूरवर पहा ... दरीत वसले गाव चिमुकले ... श्रीशिवबांची माय जिजाई मह... इथे गांधीजी राहात होते अ... आमुचे प्रणाम बाबांना ... चवदार तळ्याचे पाणी नव ... फुलाफुलांचा गंध वाहता वार... स्वातंत्र्याच्या संग्रामा... तात्या टोपे तात्या ... देह मंदिर चित्‍त मंदिर एक... सताड उघडा खिडक्या -दारे ,... सर्वात्मका शिवसुंदरा स... आकाशातुन पतंग काटले त्... आम्ही पाखरे मुठीत आमुच्या... भिऊन पावलं टाकू नका , भ... संपला अंधार हा झाली नवी प... पहा संपला तिमिर सर्व हा ... अणुरेणूतुनि शब्द प्रगटती ... दया गाणारे हात प्रभो ,...