संत निवृत्तीनाथांचे अभंग
गोत वित्त चित्त गोतासी अचुक । चाळक पंचक तत्त्वसार ॥१॥
तें जप सादृश्य कृष्णनाम सोपें । नंदायशोदाखोपें बाळलीला ॥२॥
निरसूनि गुण उगविली खूण । गोकुळी श्रीकृष्ण खेळे कैसा ॥३॥
निवृत्तिचें सार कृष्णनामें पार । सर्व हा आचार हरीहरी ॥४॥