संत निवृत्तीनाथांचे अभंग
गगन घांस घोंटी सर्व ब्रह्मांडें पोटीं । निमुनियां शेवटीं निरालंबीं ॥ १ ॥
तें ब्रह्म सांवळें माजि लाडेंकोडें । यशोदेमायेपुढें खेळतसे ॥ २ ॥
ब्रह्मांडाच्या कोटी तरंगता उठी । आप आपासाठीं होत जात ॥ ३ ॥
निवृत्तिचें ध्यान यशोदेचें धन वासुदेवखुण आम्हांमाजी ॥ ४ ॥