संत निवृत्तीनाथांचे अभंग
जयामाजी दीक्षा हारपोनि जाये । द्वैत हेंही ठाये दुजेपणें ॥१॥
तें रूप रोकडें दिसे चहूंकडे । गोपाळ संवगडे खेळताती ॥२॥
उपराति योगियां तितिक्षा हारपे । मायकार लोपे कृष्णध्यानें ॥३॥
निवृत्ति तप्तर सर्व हा श्रीधर । मनाचा विचार हारपरला ॥४॥