A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessiondhqocoe5t6dtu3pa63udbh5pr9o6nvfj): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 316
Function: require_once

निवडक अभंग संग्रह | निवडक अभंग संग्रह ६| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

निवडक अभंग संग्रह ६


*
तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवसिती भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी । तंव ते नेणोनि उपदेशाची रीती आना न उपदेशिती ठकलें निश्र्चिती तैसें जालें ॥१॥
संत ते कोण संत ते कोण । हे जाणवि खुण केशवराज ॥२॥
कोण्ही एक प्राणी क्षुधेनें पिडिले । म्हणोनि दोडे तोंडूं गेले । खावों बैसे तो नुसधि रुपी उडे । ठकलें बापुडें तैसें झालें ॥३॥
कोण्ही एक प्राणी प्रवासें पीडिला । स्नेहाळु देखिला बिबवा तो । तयाचें स्नेहलावितां अंगी । सुजला सर्वांगीं तैसें जालें ॥४॥
कोण्ही एक प्राणी पीडीला झडीं । म्हणोनि गेला पैल तो झाडी । खा खात अस्वली उठली लवडसवडीं । नाक कान तोडी तैसें झालें ॥५॥
ऎशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवर विठ्ठलीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥
*
मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं । सुमनाचा परिमळु गुंफ़ितां नये ॥१॥
तैसा जाणा सर्वेश्‍वरु म्हणों नये साना थोरु । याच्या स्वरुपाचा निर्धारु कवण जाणें ॥२॥
मोतियाचें पाणी भरतां नये वो रांजणीं । गगनासीं गवसणी घालितां नये ॥३॥
कापुराचें कांडण काढितां नये आड कण । साखरेचें गोडपण । पाखडतां नये ॥४॥
डोळियांतील बाहुली करु नये वो वेगळी । सखी म्हणुनि साउली धरितां नये ॥५॥
विठ्ठलरखुमाईचे भांडणीं कोण करी बुझवणी । निवृत्तिचे चरणीं शरण ज्ञानदेवो ॥६॥
*
सुखलागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥
तेथें अवघाची सुखरुप होसी । जन्मोजन्मींचें श्रम विसरसी ॥२॥
चंद्रभागेसीं करिता स्नान । तुझें दोष पळती रानोरान ॥३॥
लोटांगण घालोनि महाद्वारीं । कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥
नामा म्हणे उपमा काय द्यावी । माझ्या विठोबाची इडा पीडा घ्यावी ॥५॥
*
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्र्वारी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचें दाविलेसे रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ॥४॥
श्रवणाचें मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥
*
नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावुं जगीं ॥१॥
सर्व सांडुनी माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
परेहून परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३॥
सर्वांचें जें अधिष्ठान । तेंचि माझें रुप पूर्ण ॥४॥
अवघी सत्ता आली हाता । नामयाचा खेचरी दाता ॥५॥
*
तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा । पाजीं प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तूं माझी माउली मी तुझें वासरुं । नको पान्हा चोरुं पांडुरंगे ॥२॥
तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घाली मज पांडुरंगे ॥४॥
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ । मागे पुढें उभा सांभाळिसी ॥५॥
*
देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
वदनीं तुझें मंगळनाम । ह्रुदयीं अखंडित प्रेम ॥३॥
नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥
*
मनुष्य करिसी तरी भक्तीचेनि मिषे । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥१॥
श्‍वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥२॥
पक्षी करिसी तरी चारियाचेनि मिषे । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥३॥
झाड करिसी तरी तुळसोचेनि मिषे । तुझें द्वरी वसें ऎसें करी ॥४॥
वृक्ष करिसी तरी मंडप मेखचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥५॥
पाषाण करिसी तरी रंग शिलेचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥६॥
उदक करिसी तरी सडियाचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥७॥
नामा म्हणे विठो कीर्तनाचेनि मिषें । तुझे द्वारीं वसें ऎसें करीं ॥८॥
*
मुंगी व्याली शिंगी झाली तिचें दुध किती । सतरा रांजण भरुन गेले पेले बारा हत्ती ॥१॥
आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥२॥
लटिकें गेलें कटकें तेथें गाडग्याएवढें राळें । उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीएवढें डोळे ॥३॥
शेळी करी गुसळण तेथें मांजर काढी लोणी । उंदीर गेले देशांतरा ताकें भरल्या गोणी ॥४॥
पाण्यांत कासव गीत गाय वनांत कोल्हा नाचे । सावज मनीं संतोषला खोकड पुस्तक वाचे ॥५॥
कांतणी घरीं लग्न लागलें सरडा कणीक कांडी । बागूल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी ॥६॥
बाभूलीचें खोडीं माशानें केलें कोटें । सशाने सिंह ग्रासिला बेडुक आलें लोटें ॥७॥
विष्णुदास नामा म्हणे ऎका त्याची ख्याती । लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती ॥८॥
*
सदगुरुनायकें कृपा मज केला । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझें सुख मज दाविले डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्मा नाही येणें ऎसें केलें ॥३॥
नामा म्हणॆ निकी दाविली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥
*
तुझिया सत्तेनें वेदांसी बोलणें । सूर्यासी चालणें तुझिया बळें ॥१॥
ऎसा तूं समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म जाणूनि शरण आलों ॥२॥
मेघांनी वर्षावें पर्वतीं बैसावें । वायूनें विचरावें सत्ते तुझे ॥३॥
नामा म्हणे कांहीं न हाले साचार । प्रभू तू निर्धार पांडुरंग ॥४॥
*
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणें श्रीहरि नाहीं दुजें ॥२॥
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन । जनीं जनार्दन ऎसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी । कीर्तन गजरीं सप्रेमाचें ॥४॥
*
अरे मना शोक करिसी किती । हें तंव वाया धनसंपत्ति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हाती । हें अवघे अंती जायजणें ॥१॥
एक अर्बुंद साठी कोटि केखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा । सात शर्तें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥
चौदा चौकड्या लंकानाथा । नव्याणव सहस्त्र राया दशरथा । तेही गेले स्वर्गपंथा । मागें सर्वथा नुरलेचि ॥३॥
चौदा कल्प मार्कंडेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक रोम झडे । बकदालम्याचे निमिष मोडे । गेले एवढे अरे मना ॥४॥
बकदालम्याचे पुरे निमिषें । तें वटहंसाचे उपडे पिच्छे । तयासि होता मृत्युप्रवेश । तो एक श्‍वास भृशुंडीचा ॥५॥
मरणांत पुरे भृशुंडीचा । तै एक दिवस कूर्माचा । नामा विनवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धरा ॥६॥
*
पतीतपावन नाम ऎकुनी आलों मी द्वारा । पतीतपावन नव्हेसि म्हणुनी जातों माघारा ॥१॥
घ्यावें तेव्हां द्यावें ऎसा आससी उदार । काय धरुनि देवा तुझें कृपणाचे द्वार ॥२॥
सोडीं ब्रीद देवो आतां नव्हेसि अभिमानी । पतीतपावन नाम तुझें ठेवियलें कोणी ॥३॥
झेंगट घेऊनी हातीं दवंडी पिटीन तिहीं लोकीं । पतीतपावन देवो परी तूं मोठा घातकी ॥४॥
नामा म्हणे देवो तुझें न लगे मज कांही । प्रेम असों दे चित्ती म्हणुनी लागतसें पायीं ॥५॥
*
उदाराचा राणा म्हणविसी आपणा । सांग त्वां कवणा काय दिलें ॥१॥
उचिता उचिता देसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥
वर्मे तुझी कांही बोलेन मी आतां । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥
न घेतां न देसी आपुलेंहि कोणा । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥
बाळमित्र सुदामा विपत्ती पिडला । भेटावया आला तुजलागी ॥५॥
तीन मुष्टि पोह्यांसाठीं मन केलें हळुवट। मग तया उत्कृष्ट राज्य दिले ॥६॥
छळावया पांडव दुर्वास पातला । दौपदीनें केला धांवा तुझा ॥७॥
येवढिया आकांती घेऊनि भाजीपान । मग दिलें अन्न ऋषिलागी ॥८॥
बिभीषणा दिधलें सुवर्णाची नगरी । ही कीर्ति तुझी हरी वाखाणिती ॥९॥
वैरियाचें घर भेदें त्वां घेतलें । त्याचें त्यासीं दिधलें नवल काय ॥१०॥
ध्रुव आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्र्चंद रुक्मांगद आदि करुनी ॥११॥
त्याचें सेवाऋण घेऊनी अपार । मग त्या देशी वर अनिर्वाच्य ॥१२॥
एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त । एकाचें तें चित्त हिरोनी घेसी ॥१३॥
मग तया देशी आपुलें तुं पद । जगदानी हें ब्रीद मिरविशी ॥१४॥
माझें सर्वस्व तूं घेई । तुझे नको काहीं । मनोरथाची नाहीं चाड मज ॥१५॥
नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरी । करीन मी हरी सेवा ऋण ॥१६॥
*
वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परि वष्णव न होसी अरे जना ॥१॥
पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परि वैष्णव न होसी अरे जना ॥२॥
गाय़न करिसी तरी गुणीजन होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
यज्ञ करिसी तरी याज्ञिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥५॥
तीर्थ करिसी तरी कापडी
च होसी । परि वैष्णव न होसी अरे जना ॥६॥
नामा म्हणे नाम केशवाचें घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना ॥७॥
*
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथें असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरें कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्र्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥
ऎशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥
*
गंगा गेली सिधूपासीं । त्यानें अव्हेरिलें तिसीं ॥१॥
तरी ते सांगावें कवणाला । ऎसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ कोपे जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥
*
विठो माझा लेकुरवाळा । संगें लेकुरांचा मेळा ॥१॥
निवृत्ति हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥
पुढें चाले ज्ञानेश्‍वर । मागें मुक्ताई सुंदर ॥३॥
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥
वंका कडियेवरी । नामा करांगुळीं धरी ॥५॥
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥
*
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी । सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रेलोक्य भावें बंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली । विश्या गणिका ती सत्यलोका नेली । कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचे नासी बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ॥४॥
*
धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जुडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ॥५॥
*
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपळांशी लाह्या वाटी ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदे विठ्ठल नाचूं लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळला पितांबर । सावध होई देवा ऎसा बोले कबीर ॥४॥
साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं । काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऎसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ । जड मूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
नामयाची जनी लोळे संतांच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देई गे विठोई ॥७॥
*
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सांवतां म्हणे केला मळा । विठ्ठलपायीं गोविला गळा॥४॥

निवडक अभंग संग्रह

संकलित
Chapters
श्लोक ३ रा
निवडक अभंग संग्रह १
निवडक अभंग संग्रह २
निवडक अभंग संग्रह ३
निवडक अभंग संग्रह ४
निवडक अभंग संग्रह ५
निवडक अभंग संग्रह ६
निवडक अभंग संग्रह ८
निवडक अभंग संग्रह ९
निवडक अभंग संग्रह १०
निवडक अभंग संग्रह ११
निवडक अभंग संग्रह १२
निवडक अभंग संग्रह १३
निवडक अभंग संग्रह १४
निवडक अभंग संग्रह १५
निवडक अभंग संग्रह १६
निवडक अभंग संग्रह १७
निवडक अभंग संग्रह १८
निवडक अभंग संग्रह १९
निवडक अभंग संग्रह २०
निवडक अभंग संग्रह २१
निवडक अभंग संग्रह २२
श्री हनुमानजन्माचे अभंग
श्रीरामजन्माचे अभंग
श्रीकृष्णजन्माचे अभंग
मंगलाचरण पहिले
काकड आरतीचे अभंग
श्रीसदगुरु महिमा
संतसंगमहिमा
गौळण
दळण
विनंतीचे अभंग
उपसंहार व वरप्रसाद
श्रीसंत सदन महिमा
क्षीरापतीचे अभंग
प्रारब्धपर अभंग
नक्र उद्धार
नामधारकाची अधिकारश्रेष्ठता
मुका
काल्याचे अभंग
जोहार
जातें
एडका
दत्तस्तुती
दान महात्म्य (महिमा)
भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम ।
बहिरा
आरत्या
मदालसा
एकादशीचे अभंग
द्वादशीचे अभंग
चांगदेव पासष्टी

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_write_close(): Failed to write session data (user). Please verify that the current setting of session.save_path is correct (/tmp)

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: