Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

ऐ पाखरा

अब्दुल हकीम ( अंबड )

बोलकी लेखणी
9273602397


ऐक जरा
माझ्याकडेही दोन पंख
तुझ्या परी
उत्तुंग कल्पनेचे एक
दुसरे
ठासून भरलेली
जिद्द अंतरी!

तुला उशीर लागतो
जाण्या गगनात
मी कल्पना उड्डाणाने
पोहचतो क्षणात!

तुही स्वच्छंदी थोडासा
मी कवीमनाने सैराट
तू शुभ्रपंखी आकाशी
माझे इंद्रधनूष्यी थाट!

तू पंख सौंदर्याने
मी शब्दासह असेच

चल
उडत राहू!