Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कलाम आजोबा - सलाम आजोबा

अरुण वि. देशपांडे, पुणे
मो- 9850177342

कलाम आजोबा -
आम्हा मुलांसाठी
कुणी एव्हढे लहान
झाले नव्हते बाबा  !

वैभवात राहुनी तुम्ही
साधेपणा सोडीला नाही
भेटण्याचा शब्द तुम्ही
कधीच मोडीला नाही ...!

विज्ञानाचे पंख लाविले
कल्पनेस बळ मिळाले
निष्ठा ठेविता कार्याप्रती
यश हमखास मिळाले  ...!

कुतुहलाचे पाखरू आमचे
गगनी नित्य विहरावे
विज्ञानाची कास धरुनी
उंच उंच ते जावे ....!

विज्ञानाची दृष्टी दिली तुम्ही
क्षेत्र दिले नवे- नवे
पाउल पडावे पुढे पुढे
हेच आशिष द्यावे ....!

सलाम आजोबा -
कलाम आजोबा ....