Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्वागत नव्या पुस्तकांचे १

कवितासागर प्रकाशन

02322 - 225500, 09175762873, 09975873569, 08484986064
kavitasagarpublication@gmail.com

रसिक वाचक हो, कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर या प्रकाशन संस्थेने आजपर्यंत नेहमीच दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करून वाचकांचे ज्ञान वृद्धिंगत केले आहे व रंजनही केले आहे. ललित, कविता, कथा, शास्त्र अध्यात्म अशा अनेक विषयांची सहाशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. सांगली येथील सुपरिचित साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांची निरनिराळ्या साहित्य प्रकारातील पाच पुस्तके एकाचवेळी प्रकाशित करतांना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. एकाच लेखकाची एकाच वेळी निरनिराळ्या साहित्य प्रकारातील पाच पुस्तकांचे प्रकाशन हा योग अत्यंत दुर्मिळ असून हा एक प्रकारचा साहित्यातील विक्रमच आहे.

- - - डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांचा अल्प परिचय - - -
•    निवृत्त प्राध्यापक, राजारामबापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, इस्लामपूर
•    आजपर्यंत अनेक कविता, कथा, विविध विषयांवर लेख प्रसिद्ध.
•    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोनवेळा काव्य वाचनाची संधी
•    आकाशवाणी सांगली केंद्रावर कविता, कथा व आरोग्य विषयक कार्यक्रम सादर
•    साहित्य सेवेबद्दल 'जीवनगौरव' पुरस्कार - जयसिंगपूर
•    उत्कृष्ट एकांकिका लेखनाबद्दल 'नाट्यदर्पण' पुरस्कार - मुंबई
•    आरोग्य विषयक लेखनाबद्दल 'शतायुषी' पुरस्कार - पुणे
•    काव्य लेखनासाठी 'कविभूषण' पुरस्कार - फ्रेंड्स सर्कल, पुणे
•    उत्कृष्ट नाट्यछटा लेखनाबद्दल 'नाट्य संस्कार' पुरस्कार - पुणे
•    नाट्य अभिनय, दिग्दर्शन या बद्दल अनेक पारितोषिके
•    मराठवाडा भूकंपग्रस्त भागात वैद्यकीय सेवा
•    अध्यक्ष - संस्कार भारती, सांगली
•    आजीव सदस्य - श्रीरंग कलानिकेतन, तळेगाव दाभाडे, पुणे
•    माजी अध्यक्ष - चंद्रकिरण काव्य मंडळ, तळेगांव दाभाडे, पुणे     

डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी (सांगली)
संपर्क: 9975600887, 7769005605, vyankateshjambagi@gmail.com

 
काळजाला भिडणारा, घरातलंच वास्तव दाखवणारा, कौटुंबिक लघुकथासंग्रह
तुझं घर माझं घर

अनेक साहित्य प्रकार सहज हाताळणा-या डॉ. व्यंकटेश जंबगी यांचा आवडता साहित्य प्रकार म्हणजे लघुकथा! त्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. कथाकथनाचे कार्यक्रम, आकाशवाणी सांगली येथून 'साहित्य सौरभ' मध्ये कथाकथन, कथा स्पर्धांमधून पारितोषिके मिळाली.

या कथासंग्रहातील सर्वच्या सर्वच सतरा कथा या पूर्व प्रकाशित आहेत. त्याला वाचकांची भरभरून दाद मिळाली आहे. अनेक पत्रे आली असून, त्यात मान्यवर लेखकांचीही पत्रे आहेत; एका विद्यार्थिनीने तर त्यातील कथेमुळे आपली निराशा पूर्णपणे गेल्याचे कळवले. संपूर्ण भारतातून पंधरा विविध भाषांतील कथा एका कन्नड लेखकाने निवडल्या व त्याचे कन्नड भाषेत भाषांतर करून कथासंग्रह प्रकाशित केला. त्या पंधरा कथांमध्ये 'तुझं घर माझं घर' या कथासंग्रहातील 'मी घरी येणार नाही' ही कथा समाविष्ट होती. या कथा लोकप्रिय होण्याचे कारण वास्तववादी कथा! कुठेही कल्पनारम्यता, गूढ, अवास्तवता नाही. आपल्याच घरात घडलेली कथा वाटते. प्रत्येक पात्र आपल्याला कधीतरी भेटले असावे असे वाटते.

भाषा सहज, सुबोध असली तरी उच्च साहित्यिक मूल्य जपणारी आहे. कथेतील संवाद मनाला स्पर्शून जातात. सर्वच कथा प्रवाही आहेत. कुठेही कंटाळा येत नाही. वाचकाने यातील पहिली कथा वाचायला घेतली तर तो शेवटची कथा वाचून होईपर्यंत पुस्तक खाली ठेवणार नाही. याची खात्री वाटते. प्रत्येक कथा शेवटी काहीतरी सांगून जाते. विचार करायला प्रवृत्त करते.

पृष्ठे - १५२        किंमत - १७५       ISBN - 978-81-934308-2-8
----------------------------------------------------------------------
 
घरातील मंडळींनी एकत्र बसून वाचण्यासारखा निखळ विनोदी कथासंग्रह
व्रात्यकथा

हसणे हे माणसाला परमेश्वराने दिलेले एक वरदान आहे. जगात फक्त मनुष्यप्राणीच हसू शकतो. विसंगतीने हसू येते. विसंगती हि विनोदाची जननी आहे. डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांनी मानवी जीवनात नेहमी आढळणा-या विसंगतीचे निखळ आणि दर्जेदार चित्रण 'व्रात्यकथा' या विनोदी कथासंग्रहात केले आहे. कोणत्याही प्रकारची अश्लीलता नसलेला हा कथासंग्रह असून घरातील सर्वांनी एकत्र बसून वाचण्यासारखा आहे. डॉ. जंबगी म्हणतात, “महागाई, संप, अवमान, आजारपण, संकटे या गोष्टी जीवनात अपरिहार्य आहेत. विनोदी साहित्याने मन हलके होते. मनाचा संबंध शारीरिक व्याधींशी आहे हे सिद्ध झाले आहे.”

लेखक स्वतः डॉक्टर असल्यामुळे हास्य हे मनाबरोबर शरीराचीही व्याधी बरा करण्याचे साधन आहे. याची त्यांना जाणीव आहे. निखळ हास्याचा त्यांचा हा 'हास्योपचार' खळखळून हसवणारा आहे. प्रत्येक कथेमधून माणसांचे निरीक्षण किती बारकाईने होऊ शकते हे दिसून येते.

सध्या मराठीत विनोदी लेखन करणारे जे मोजके कसदार लेखक आहेत, त्यापैकी डॉ. व्यंकटेश जंबगी हे एक असे लेखक आहेत ज्यांच्या लेखनात विनोद असला तरी त्याआडून कित्येक सामाजिक समस्यांचा व आपल्या आजूबाजूच्या घडामोडींचा व बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात.  त्यांच्या विशिष्ट विसंगतीतून निर्माण झालेल्या कथा या वाचनीय, श्रवणीय झाल्या आहेतच त्या 'प्रेक्षणीय' होण्यासाठी त्यांना एकांकिकेचे स्वरूपसुद्धा देता येईल असे वाटते.

पृष्ठे - १२०        किंमत - १६०       ISBN - 978-93-87127-01-2