Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पाककृती: कणिक खोबऱ्याच्या वड्या

मंजुषा सोनार



साहित्य:

•    जाड कणिक (एक वाटी)
•    तूप (अर्धी वाटी)
•    खोबरे (अर्धी वाटी)
•    किसलेला गूळ (3/4 वाटी)
•    थोडेसे दूध
•    काजू, बदाम, किसमिस यांचे तुकडे (ऐच्छिक)

कृती:
•    सर्वप्रथम गैसवर जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा वाटी तूप टाकावे व ते वितळू द्यावे.
•    त्यात जाड कणिक टाकून तांबूस रंग येईपर्यंत भजावे
•    मग त्यात किसलेले खोबरे टाकावे आणि मिश्रण खूप वेळ हलवावे.
•    नंतर त्यात किसलेला गूळ टाकावा आणि मंद गैसवर हलवत राहावे
•    नंतर त्यावर थोडा दुधाचा शिडकावा द्यावा आणि गैस बंद करावा
•    मग एका ताटलीला तूप लावून ते मिश्रण त्यावर थापा
•    मग त्यावर काजू, बदाम, किसमिस यांचे बारीक तुकडे पेरा किंवा टाका
•    मिश्रण गरम असतांना त्याच्या सराट्याने वड्या पाडा
•    थंड झाल्यावर आपल्या प्रियजनांना डीशमध्ये खायला द्या