Get it on Google Play
Download on the App Store

संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 10

१९३० मध्ये आम्हांला त्रिचनापल्लीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. अमळनेरच्या हायस्कूलातील नोकरी सोडून मी सत्याग्रहात सामील झालो होतो. आमच्या शाळेत एक बंगाली मित्र होते. त्रिचनापल्लीच्या तुरुंगातील एक मित्र श्री. व्यंकटाचलम सुटणार होते. ते बी. एससी. होते. त्यांना तामील, तेलगू मल्याळम भाषा येत होत्या. मी अमळनेरच्या मित्रांना लिहिले, 'यांना आपल्या शाळेत घ्या. बंगाली मित्र आहेत. हे दक्षिणेकडील एक मित्र होतील. आपली शाळा भारतीय ऐक्याचे प्रतीक होवो. भारतातील सर्व प्रांतांतील तेथे शिक्षक असतो. त्या त्या प्रांतांची भाषा कानी येईल. त्या त्या प्रांतांची संस्कृती, वाङ्‌मय सारे कळेल.' मी असे पत्र लिहिले होते. तेव्हापासून माझ्या मनात स्वप्न होते की, केव्हा तरी अशी संस्था काढायची-जी भारताचे ऐक्य शिकवील, अनुभवील.

आपण अखंड भारत म्हणून जगत आलो, परंतु या भारताचे आपणास ज्ञान नाही. हे सारे प्रांत माझे, या सर्व भाषा माझ्या, हे सारे माझे भाऊ, सर्वांना भेटेन, सारे अभ्यासीन-असे आपणास कोठे वाटते? महात्माजी देशातील निरनिराळया भाषा वेळात वेळ काढून अभ्यासीत. पू. विनोबाजी तेच करीत आले. आपणापैकी कितीकांना ही तहान आहे? मुंबईत रशियन, जर्मन, फ्रेंच वगैरे भाषा शिकवायची सोय आहे, परंतु अशी संस्था नाही-जेथे सकल भाषा शिकता येतील.

म्हणून आन्तरभारती संस्था स्थापण्याचे माझे कधीपासूनचे स्वप्न. सुंदरशी जागा असावी. सरकारजवळ मागावी किंवा भल्या सज्जनाने दिली तर कृतज्ञतेने घ्यावी. तेथे त्या त्या प्रांतीय भाषेतील कोणी तज्ञ असतील. त्या सर्वांना हिंदी येत असावे. त्या त्या भाषेतील वाङ्‌मय तेथे राहील.

संस्थेला जोडून विद्यालय असावे. शेती, हस्तोद्योग असावेत. भारतीय भाषा शिकण्याची तेथे सोय होईल. विद्यार्थ्यांच्या कानावर सर्व भाषा पडतील. निरनिराळया साहित्याचा मराठीला परिचय करून देण्यात यावा. इतर भाषांतूनही मासिके काढून त्या त्या प्रांतियांना सकल भारताची ओळख करून द्यावी,-असे माझे स्वप्न.

गुरुदेव रवीन्द्रनाथ विश्वकवि. त्यांनी विश्वभारती स्थापिली. जगाचा नि भारताचा संबंध असू दे. पूर्व ती पूर्व, पश्चिम ती पश्चिम असे नाही. पूर्वेकडून निघाला तो पश्चिमेला भेटतो. पश्चिमेकडून निघाला तो पूर्वेला भेटेल. पृथ्वी वाटोळी आहे. पूर्ण आहे. भारत विश्वाच्या ऐक्याचा अनुभव घेण्यासाठी आहे, परंतु विश्वाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःचा अनुभव घ्यावा.

स्वप्न आणि सत्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वातंत्र्य व स्वराज्य 1 स्वातंत्र्य व स्वराज्य 2 स्वातंत्र्य व स्वराज्य 3 स्वातंत्र्य व स्वराज्य 4 स्वातंत्र्य व स्वराज्य 5 स्वातंत्र्य व स्वराज्य 6 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 1 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 2 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 3 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 4 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 5 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 6 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 7 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 8 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 9 जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 10 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 1 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 2 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 3 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 4 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 5 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 6 सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 7 समाजवाद 1 समाजवाद 2 समाजवाद 3 समाजवाद 4 समाजवाद 5 समाजवाद 6 समाजवाद 7 समाजवाद 8 समाजवाद 9 सत्याग्रह 1 सत्याग्रह 2 सत्याग्रह 3 सत्याग्रह 4 सत्याग्रह 5 सत्याग्रह 6 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 1 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 2 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 3 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 4 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 5 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 6 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 7 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 8 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 9 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 10 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 11 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 12 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 13 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 14 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 15 संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 16 संस्कृति व साहित्य 1 संस्कृति व साहित्य 2 संस्कृति व साहित्य 3 संस्कृति व साहित्य 4 संस्कृति व साहित्य 5 संस्कृति व साहित्य 6 राष्ट्रीय चारित्र्य 1 राष्ट्रीय चारित्र्य 2 राष्ट्रीय चारित्र्य 3 संतांचा मानवधर्म 1 संतांचा मानवधर्म 2 संतांचा मानवधर्म 3 संतांचा मानवधर्म 4 संतांचा मानवधर्म 5 संतांचा मानवधर्म 6 संतांचा मानवधर्म 7 संतांचा मानवधर्म 8 संतांचा मानवधर्म 9 संतांचा मानवधर्म 10 संतांचा मानवधर्म 11 संतांचा मानवधर्म 12 संतांचा मानवधर्म 13 संतांचा मानवधर्म 14 संतांचा मानवधर्म 15 संतांचा मानवधर्म 16 संतांचा मानवधर्म 17 संतांचा मानवधर्म 18 संतांचा मानवधर्म 19 संतांचा मानवधर्म 20 संतांचा मानवधर्म 21 निसर्ग 1 निसर्ग 2 निसर्ग 3 निसर्ग 4 निसर्ग 5 निसर्ग 6 निसर्ग 7 निसर्ग 8 निसर्ग 9 मृत्यूचे काव्य 1 मृत्यूचे काव्य 2 मृत्यूचे काव्य 3 मृत्यूचे काव्य 4 मृत्यूचे काव्य 5 संतांची शिकवण