Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्वातंत्र्य व स्वराज्य 4

''तुका म्हणे व्हावी
प्राणासवे ताटी
नाही तर गोष्टी
बोलू नये''

आपण श्रध्दांजली वाहिली. त्यांना श्रध्दांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रध्दांजली. आज सर्वोदय, समन्वय अनेक
शब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ॠषीश्वरांपासून सारे सांगत आले. परंतु केवळ  शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे हा प्रश्न आहे. सर्वाचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते. परंतु सर्वांच्या उदयाची तीव्रता लागूल राहिली आहे का? भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने राष्ट्राचे
होणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला जात आहे. गरिबांचे काय? - हा प्रश्न आहे.

महात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते. (१) आर्थिक समता, (२) सामाजिक समता, (३) धार्मिक समता (४) लोकशाही सरकारचे धोरण पसंत नसेल तर शांततेने विरोध दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत हे पाहिले म्हणजे दुःख होते. वेदना होतात. दिल्लीला महात्माजींनी म्हटले,... ''एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान आर्थिक विषमता सहन करणार नाही.'' परंतु आज काय दिसते? शेतकर्‍याला दिलीत जमीन? काटकसर करून विकत घे असे सांगणे म्हणजे सर्वोदयी श्रध्दा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही. त्याच्याजवळ दोन-चार बिघे जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठणार नाहीत हे का काँग्रेसी मंत्र्यांना माहीत नाही? चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की, कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे. तुमच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडत पिचत ठेवणार होय? गरीबांच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकीची भाकर भाजणार? दुसर्‍यांना सत्तालोलुप म्हणणार्‍या  या लोकांची ही सत्ता टिकविण्याची कारस्थाने पाहिली की किळस येतो. जो प्रकार शेतकर्‍याच्या बाबतीत तोच प्रकार कामगारांच्या बाबतीत. उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा म्हणून त्यांना येता जाता सारे डोस पाजीत आहेत. चार महिन्यांत १०० कोट नफा उकळणार्‍या गांधीभक्त मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे? ज्या कारखान्यात आपण श्रमतो तेथील माल जनकल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळा बाजार होणार नाही, तेथील नफा धनवंतांच्या विलास दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, - हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल? एवंच, आर्थिक समता दूर आहे. आणि सामाजिक समता? जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने सर्व थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी कशी दूर होणार?

स्वप्न आणि सत्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वातंत्र्य व स्वराज्य 1
स्वातंत्र्य व स्वराज्य 2
स्वातंत्र्य व स्वराज्य 3
स्वातंत्र्य व स्वराज्य 4
स्वातंत्र्य व स्वराज्य 5
स्वातंत्र्य व स्वराज्य 6
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 1
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 2
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 3
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 4
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 5
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 6
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 7
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 8
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 9
जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 10
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 1
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 2
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 3
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 4
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 5
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 6
सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 7
समाजवाद 1
समाजवाद 2
समाजवाद 3
समाजवाद 4
समाजवाद 5
समाजवाद 6
समाजवाद 7
समाजवाद 8
समाजवाद 9
सत्याग्रह 1
सत्याग्रह 2
सत्याग्रह 3
सत्याग्रह 4
सत्याग्रह 5
सत्याग्रह 6
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 1
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 2
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 3
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 4
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 5
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 6
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 7
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 8
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 9
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 10
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 11
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 12
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 13
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 14
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 15
संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 16
संस्कृति व साहित्य 1
संस्कृति व साहित्य 2
संस्कृति व साहित्य 3
संस्कृति व साहित्य 4
संस्कृति व साहित्य 5
संस्कृति व साहित्य 6
राष्ट्रीय चारित्र्य 1
राष्ट्रीय चारित्र्य 2
राष्ट्रीय चारित्र्य 3
संतांचा मानवधर्म 1
संतांचा मानवधर्म 2
संतांचा मानवधर्म 3
संतांचा मानवधर्म 4
संतांचा मानवधर्म 5
संतांचा मानवधर्म 6
संतांचा मानवधर्म 7
संतांचा मानवधर्म 8
संतांचा मानवधर्म 9
संतांचा मानवधर्म 10
संतांचा मानवधर्म 11
संतांचा मानवधर्म 12
संतांचा मानवधर्म 13
संतांचा मानवधर्म 14
संतांचा मानवधर्म 15
संतांचा मानवधर्म 16
संतांचा मानवधर्म 17
संतांचा मानवधर्म 18
संतांचा मानवधर्म 19
संतांचा मानवधर्म 20
संतांचा मानवधर्म 21
निसर्ग 1
निसर्ग 2
निसर्ग 3
निसर्ग 4
निसर्ग 5
निसर्ग 6
निसर्ग 7
निसर्ग 8
निसर्ग 9
मृत्यूचे काव्य 1
मृत्यूचे काव्य 2
मृत्यूचे काव्य 3
मृत्यूचे काव्य 4
मृत्यूचे काव्य 5
संतांची शिकवण