Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

ब्राह्मणमाहात्म्य

या वर्गात ब्राह्मणांना हितकारक अशा प्रार्थना आणि ब्राह्मणांचे अहित करू पहाणारांचे अनिष्ट चिंतणारे मंत्र येतात. ब्राह्मणांना ‘देव’ ही उपाधी प्राप्त झाल्याचे येथे दिसते. 

येथे ब्राम्हण म्हणजे जातीने ब्राम्हण नाही तर कर्माने स्वत:चे पांडित्य सिद्ध करणारे लोक म्हणजे ब्राम्हण याची नोंद घ्यावी.

राजाचे पुरोहित या नात्याने आपले महत्व त्यांना पूर्णतः जाणवलेले दिसते. 

ब्राह्मणाचा छळ करणे वा ब्राह्मणहत्या करणे ही दोन्ही कृत्ये महापापांत गणलेली आहेत. 

ब्राह्मणांना दक्षिणा दिल्याने मिळणाऱ्या पुण्यावर बराच भर देण्यात आला आहे. दक्षिणेला गूढ आणि गहन अर्थ देण्यात आला आहे.

दक्षिणा म्हणून देण्यात येणाऱ्या अजाची म्हणजे बकऱ्याची तुलना अज एकपादाशी जी  ऋग्वेदात निर्देशिलेली एक अंतरिक्षीय देवता आहे तिच्याशी  केलेली दिसते.

 ब्राह्मणाची पत्नी आणि मालमत्ता यांना धक्का लावणाऱ्यांना उद्देशून अनेक शाप दिले आहेत . 

यशःप्राप्ती, वर्चःप्राप्ती आणि मेधावर्धन,बुद्धीचा विकास यांसाठी ब्राह्मणांच्या प्रार्थना आहेत .