Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

विश्वोत्पत्ती आणि अध्यात्म

वेद म्हणून प्रतिष्ठा मिळावी म्हणूनही ही सूक्ते अथर्ववेदात अंतर्भूत केली गेली असावीत. ऋग्वेदादी संहिता आणि उपनिषदे यांतील तत्त्वचिंतनाहून मात्र या सूक्तांतील तत्त्वचिंतनाचे स्वरूप थोडे वेगळे आहे.

प्रायः अंतिम सत्याचा पाठपुरावा करण्याची खरी तळमळ त्यांत दिसून येत नाही, त्यांच्यामागील हेतूही मुख्यतः व्यावहारिकच आहेत, त्यांतील तात्त्विक कल्पनाही अत्यंत यांत्रिकपणे हाताळलेल्या आहेत. असे विचार अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहेत.

या वर्गातील सूक्तांत गणले जाणारे भूमिसूक्त मात्र तत्त्वज्ञानाचा नाही, तरी काव्यसौंदर्याचा उत्कृष्ट प्रत्यय देते. या सूक्तातील काही ऋचा पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी आहेत.