Get it on Google Play
Download on the App Store

अथर्ववेदाच्या शाखा

अथर्ववेदाच्या नऊ शाखा उल्लेखिल्या जातात त्या अशा पैप्पलाद, तौद किंवा तौदायन, मौद किंवा मौदायन, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श, चारणवैद्यया शाखांपैकी पैप्पलाद आणि शौनक या दोन शाखांच्या संहिताच आज उपलब्ध आहेत.

पैप्पलाद हे नाव पिप्पलाद नामक ऋषीच्या नावावरून आले आहे. पैप्पलाद शाखेचा प्रवर्तक हाच असावा. पैप्पलाद शाखेच्याअथर्ववेदसंहितेत एकूण वीस कांडे आहेत. शं नो देवी:...या मंत्राने या संहितेचा प्रारंभ होतो. सत्तर वर्षांपूर्वी पैप्पलाद संहितेची एक प्रत काश्मीरमध्ये उपलब्ध झाली. ब्लूमफील्ड आणि आर्. गार्बे यांनी या संहितेच्या हस्तलिखिताचे संपादन केले आहे.

 शौनकसंहितेत पैप्पलादसंहितेप्रमाणेच एकूण वीस कांडे आहेत. या संहितेत मुळात अठराच कांडे असावीत आणि १९ वे व २० वे कांड त्यांस नंतर जोडले गेले असावे, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. या संहितेत ७३१ सूक्ते असून सु. ६,००० ऋचा आहेत. विसाव्या कांडातील बहुतेक सूक्ते ऋग्वेदातूनच घेतलेली आहेत.