Get it on Google Play
Download on the App Store

दुसऱ्यांना नियंत्रित करू नका

लक्षात ठेवा, आपण साऱ्या जगाचे स्वामी नाही. आपली तशी इच्छा असते परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की आपण तेच मनात धरून बसावे. आपण लोकांना आणि गोष्टींना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात सफल होत नाही. त्यामुळे तणाव वाढतोच.. दुसऱ्या गोष्टी जशा घडतात आणि दुसरे लोक जसे वागतात त्याचा स्वीकार करावा. या गोष्टीचा सुद्धा स्वीकार करा की वेगवेगळ्या स्थितीत गोष्टी वेगवेगळ्या असतात. लक्षात ठेवा, तुम्ही केवळ स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकता. तेव्हा दुसऱ्यांना नियंत्रित करण्यापूर्वी स्वतःला ताब्यात ठेवायला शिका. हे देखील लक्षात घ्या की स्वतः काम करण्याच्या ऐवजी तुम्ही ते दुसऱ्यांकडून सुद्धा करून घेऊ शकता. आपल्याला दुसऱ्यांना आपल्या अधीन ठेवण्याची दुर्दम्य इच्छा असते. त्यापासून लांब राहणे यातच आपले भले असते. त्यामुळे जीवन तणावमुक्त राहते.