Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शानदार सुरुवात

आधी मी उशिरा उठत असे आणि अंथरुणातून उठताच स्वतःची आणि मुलांची तयारी करायची धामधूम उडत असे. कसेबसे मुलांना शाळेत सोडून कामावर उशिरा जात असे. त्यामुळे कामात मी मागे पडत होतो, उदासीन राहायला लागलो होतो, चिडचिडा झालो होतो. प्रत्येक दिवस असाच सुरु होत होता. आता मात्र मी सकाळची कामे नीट मार्गी लावली आहेत. बहुतेक सर्व छोटी छोटी कामे मी ८ वाजायच्या आधीच उरकून घेतो. आता मुले आणि मी लवकर तयार होतो. इतर लोक धावपळ करत असतात त्यावेळी मी कामावर पोचून कामाला लागलेला देखील असतो. सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासारखे उत्तम दुसरे काहीही नाही.