Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

दिवसाचे अभिवादन

सकाळी लवकर उठल्याने तुम्ही एका शानदार दिवसाची सुरुवात पाहू शकता. सकाळी सकाळी लवकर उठून प्रार्थना करण्याची आणि परम पित्याला धन्यवाद देण्याची सवय स्वतःला लावून घ्या. दलाई लामा म्हणतात - "सकाळी उठून तुम्ही हा विचार करा - ' आज उठून मी धन्य आहे की मी जिवंत आहे आणि सुरक्षित आहे, माझे जीवन अनमोल आहे, मी त्याचा युगी उपयोग करेन. आपली सर्व उर्जा मी अत्मविकासात लावेन, आपले हृदय दुसऱ्यांसाठी उघडे ठेवीन, सर्व जीवांच्या कल्याणासाठी काम करीन, दुसऱ्यांच्या बद्दल मनात चांगले विचार ठेवेन, कोणाहीमुळे नाराज होणार नाही आणि कोणाचे वाईट चिंतणार नाही, दुसऱ्याचे जेवढे म्हणून हित करता येईल तेवढे हित करीन'. "