Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नादिर शाहनंतर बाबर चा हिरा पुढची दोन दशके मोघल राज्यकर्त्यांना मिळत राहिला, जोपर्यंत तो मोहम्मद शाह याच्या हातात आला नव्हता. त्याच दरम्यान पर्शिया च्या नादिर शाह याची नजर दिल्लीवर पडली आणि त्याने दिल्ली जिंकायची ठरवले. करनाल च्या १०३८ च्या ऐतिहासिक युद्धानंतर नादिर शाह याने मोघल राजधानीत प्रवेश केला.
१७३९ मध्ये नादिर शहा ने मोहम्मद शहा ला पराभूत करून दिल्लीवर कब्जा केला. त्याचे सर्व जड जवाहीर आपल्या ताब्यात घेतले. परंतु खूप शोधून देखील त्याला कोहिनूर हिरा सापडला नाही. अनेक दिवसानंतर एका दासीने त्याला सांगितले की मोहम्मद शाह कोहिनूर हिरा आपल्या पगडीत लपवून ठेवतो. हे ऐकून नादिर शाहने एक योजना आखली. त्याने मोहम्मद शहाला एका समारंभाला बोलावले आणि जेवणाच्या वेळी मैत्री साठी म्हणून पगड्या बदलण्याची विनंती केली. मोहम्मद शाहला नाईलाजाने कोहिनूर हिरा नादिर शहाला द्यावा लागला. त्याला पाहताच नादिर शाह म्हणाला की कोहिनूर म्हणजे प्रकाशाचा पर्वात! अशा प्रकारे त्याचे नाव कोहिनूर पडले.