श्यामची आई (Marathi)
पांडुरंग सदाशिव साने
'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे. मातेबद्दलच्या असणार्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी १९३३ गुरूवारी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी १९३३ सोमवारी पहा्टे त्या संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्य सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.READ ON NEW WEBSITE