Get it on Google Play
Download on the App Store

मार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक) (Marathi)


Nimish Navneet Sonar
आजकालच्या न्यूज चैनेल्सला मी "मार्जारी आगलावे" असे संबोधले आहे. कारण ते सतत आग लावण्याचे प्रयत्न करत असतात, टी आर पी मिळवण्यासाठी! या विनोदी नाटकात कुठल्याही घडलेल्या घटनेवर किंवा व्यक्तींवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (न्यूज चैनेल चे पत्रकार) ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल? आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला! 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आहे. एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो आणि विशेष म्हणजे आपण ते बातम्या म्हणून बघतो सुद्धा!! यात वाचा कुमारी 'अखंडा बडबडकर' आणि "श्री आक्रमक बातमीदार" हे दोन्ही बघा काय काय प्रश्न विचारून आणि कुठले लॉजिक कुठे लावून कुणा कुणाला कसे भंडावून सोडते ते!!
READ ON NEW WEBSITE