Get it on Google Play
Download on the App Store

खलील जिब्रानच्या निवडक कथा (Marathi)


महाकाल
आर्मीनिया देशातील लेबेनॉन या गावी जन्मलेला एक अरबी वेडा खालिल जिब्रान इजिप्त, फ्रान्स, अमेरिका वगैरे देशात गेला. तेथे उत्तम शिकला पण मोठ्या प्रयत्नांनी वेडाचा वेडाच राहिला आणि त्याने अरबीप्रमाणे इंग्रजी भाषेच्या द्वारेदेखील पुष्कळाना वेड लावले. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलील जिब्रान हा सार्वकालिक बेस्टसेलर असणारा तिसरा कवी आहे. या पुस्तकात आपण त्यांच्या काही प्रसिद्ध कथांचा स्वैर मराठी अनुवाद वाचू शकता.
READ ON NEW WEBSITE