मी वेडा कसा झालों?
तुम्हाला प्रश्न पडला असेल न कि मी वेडा कसा झालो? सांगतो. हि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा पुष्कळसे देव अस्तित्वात नव्हते. एके दिवशी मी गाढ झोपलेला होतो. काही वेळाने मला जाग आली. आणि पाहतो तर काय? मी गेल्या ७ जन्मांमध्ये बनवलेले आणि वापरलेले माझे मुखवटे गहाळ झाले होते.
मी लगेचच चोराला शिव्या देत बिना मुखवट्याचा रस्त्यांवरून धावत सुटलो. बायका, पुरुष, मुले सगळेच माला धावताना पाहून हसू लागले. काही लोकांना मात्र माझी भीती वाटली आणि ते घाबरून पळून गेले आणि घरात जाऊन लपले.
मग मी भर चौकात पोहचलो. तेव्हा बिल्डींगच्या टेरेसवर उभा असलेला एक मुलगा मला उद्देशून ओरडूला
म्हणाला, 'हा येडा, आहे येडा!'
तो कोण आहे हे पाहाण्यासाठी मी नजर वर केली आणि सूर्याने किरण आयुष्यात प्रथमच माझ्या चेहऱ्यावर पडले.ते किरण माझ्या चार्म चक्षुमार्फत थेट माझ्या मनावर पडले. जणू सूर्याने माझ्या आत्म्याला आलिंगन दिले होते. आता मला त्या जुन्या मुखवट्यांची काय आवश्यकता होती? मी अचाकपणे भानावर आलो.
मी दोन्ही हात वर केले आणि सूर्याकडे पाहून मोठ्याने ओरडलो, “ धन्यवाद! ज्याने माझे मुखवटे पळवले त्या माणसाचे मनापासून धन्यवाद! त्याचे भले होवो!’
आशा रीतीने मी ठार वेडा झालो. या वेडेपणामुळे मला स्वातंत्र्य मिळाले. सुरक्षित वाटू लागले. हो, एकटेपणाचे स्वातंत्र्य! आणि ज्या लोकांना माझ्याबद्दल काडीचीही माहिती नसते अशा लोकांपासून दूर सुरक्षित! कारण हीच लोकं आमच्यासारख्यांना कोणत्या न कोणत्या प्रकारे गुलाम बनवत असतात.
मी सुरक्षित आहे मात्र काही भूषणावह गोष्ट नाहीये. तुरुंगात एक गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगारापासून सुरक्षितच असतो.