श्री शिवराय 11
शिवछत्रपतींची आरती
आरती शिवराया, तुझ्या वंदितो पाया।
तुझ्यावरून कुरवंडावी, आम्ही आमुची काया ।।आरती।।
भारती दाही दिशा, होती दास्याची निशा ।
अशा वेळे आणलीस, प्रभो स्वातंत्र्य-उषा ।।आरती।।
जागले सर्व जन, दिली अद्भुत स्फुर्ती ।
जागले सर्व जन, झाली अपार कीर्ती ।।आरती।।
ठायी ठायी वीर नाना; बाजी मुरार, तान्हा ।
स्वातंत्र्यार्थ शिवराया, देती आनंदे प्राणा ।।आरती।।
महाराष्ट्र पुण्यभूमी, केली पसंत तुम्ही ।
लावियला भव्य दीप, येथे मोक्षाचा तुम्ही ।।आरती।।
किती तुज आळवावे, प्रभो किती रे गावे ।
स्फूर्तीचा सागर तू, तुला सदैव घ्यावे ।।आरती।।
ऐक्याचा, स्वातंत्र्याचा, देशी संदेश थोर ।
त्यागाची अंतरंगी, फुलविशी चंद्रकोर ।।आरती।।
तुझी स्मृती नित्य राहो, अमुचे करंटेपण जावो ।
भारतमाता प्यारी, झणी स्वतंत्र होवो ।।आरती।।
जय हिंद!