Get it on Google Play
Download on the App Store

बेपत्ता

"माधव काय झालं. प्रिया कुठे आहे. वाजलेत बघ किती रात्रं झालीय" मेघना चिंतेने म्हणाली.

"मी जरा रवी आला कि, त्याला भेटून येईन म्हणतो.. प्रिया फोन उचलत नाहीये." माधवने उत्तर दिलं

लग्नाची खरेदी केलेल्या सगळ्या पिशव्या तश्यात पडून होत्या. या सगळ्या गोंधळात मेघनाने देवाचा दिवा लाऊन गणपतीला पाण्यात ठेवलं होतं. लग्न ठरलेली मुलगी सापडत नव्हती आता ४ तास झाले होते. मेघनाने माधवला रवीला फोन करायला सांगितला होता. रवीने काही वर्षापूर्वीच निवृत्त घेतली होती. माधवने रवीला फोन केल्यामुळे तो घरी लवकर आला होता. त्याने आपल्या पोलीस मित्रांना विचारून प्रियाची चौकशी केली होती. ते माधवला आपल्याबरोबर घेऊन जायला घरी आले होते. बंगल्यावर आता फक्त सागर आणि त्याला सांभाळणाऱ्या कामवाल्या मावशी होत्या.

रवीचा फोन आल्या आल्या माधव बिल्डींगच्या खाली उतरला. 

"अरे, काय झालं माधव, काळजी करू नकोस मी सगळ्यांना सांगितलं आहे. तुम्ही तिच्या मैत्रिणींकडे फोन केला का ?" रवीनी त्याची स्कूटर थांबवली आणि माधवला विचारले.

माधव बंगल्याच्या बाहेर उभा होता. अस्वस्थतेने इकडे तिकडे बघत होता. मेघना आता प्रियाच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारत होती. प्रिया कुणाकडेच गेली नाही याची महिती मेघनाला कळल्यावर तिने माधवला लगेच फोन करून सांगितले.  

"रवी, प्रिया सापडत नाहीये, प्रिया कुठे निघून गेली कि काय कळायला मार्ग नाहीये. फोन हि उचलत नहिये हि मुलगी. मेघनाचा फोन होता कि तिच्या कोणत्याच मैत्रिणींकडे नाहीये ती..!" माधव आता रडवेला झाला होता.

प्रिया त्यांची एकुलती एक मुलगी होती. ती त्याचा जीव की प्राण होती. त्याचे डोळे भरून आले होते. 

"अरे... प्रिया खूप हुशार मुलगी आहे. ती अशी कुठेतरी कशी जाईल? ती इथेच कुठेतरी असेल. ती येईल, काळजी करू नकोस.” रवीने माधवच्या खांद्यावर हात ठेवून सांत्वन केले.

हे हि तितकेच खरे होते की प्रियाच्या काळजीपोटी रवी स्वतःही अस्वस्थ होता. प्रिया ही त्याला सागर इतकीच लाडकी होती.

"नाही, रवी. सगळीकडे पाहिलंय. एकदा नाही तर अनेक वेळा." माधव आशेने म्हणाला.

"चला पोलीस स्टेशनला जाऊया. बस गाडीवर...!" रवीनी त्याची स्कूटर चालू केली. माधवला बसण्यासाठी सांगितले. माधव शांतपणे बसला. ते पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले.