Get it on Google Play
Download on the App Store

वेडं प्रेम

दुसऱ्या दिवशी प्रिया परत आली होती. तिला अमेरिकेला जायच्या आधी सागरबरोबर नीट वेळ घालवायचा होता. प्रियाला माहिती होतं कि, ती एकदा निघून गेली की,  परत सागरला भेटणं होणार नाही.  ते दोघ त्यांच्या आवडत्या कामाला लागले.

"अनेक झाडे निरुपयोगी झाली आहेत. त्यांना खताची गरज आहे. आपण बाजूला काढून ठेवलेलं खत रवी काकांना टाकायला सांगते."

"काय झालं तू इतका गप्प का?" प्रियाने शेजारी खिन्नपणे बसलेल्या सागरला विचारले.

"तू मला सोडून जाशील का मग?" सागरच्या डोळ्यात पाणी आले.

"अरे...! बरं तू रडू नको बघ नाहीतर मी बोलणार नाही." प्रियालाही त्याला रडताना पाहून वाईट वाटले.

“नको नको तसं नको... तू बोल माझ्याशी... मी नाही रडणार..." सागरने पटकन अश्रू पुसले.
"शाहणा मुलगा आहेस, सागर. हे करावं लागेल. प्रत्येकजण लग्न करतो. आणि लग्नानंतर नवरीला नवऱ्याकडे जावं लागतं.” प्रिया सागरला समजावण्याचा प्रयत्न करत होती.

"मग तू... माझ्याशी लग्न कर. माझी नवरी हो. मग तू इथेच राहशील." सागरचे डोळे चमकले.

हे ऐकून प्रियाला आश्चर्याचा धक्का बसला. सागर नक्की काय म्हणाला याचा विचार करत ती त्याच्याकडे आश्चर्यचकितपणे पाहतच राहिली.

प्रिया उठून तिथून निघून घरात गेली. भाबडा सागर तिच्या किचनमध्ये जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे आशेने पाहत राहिला...!