सवय
आता दोघेही हळूहळू वयात येत होते. त्यांची मैत्री तशीच निखळ होती. सागरचे वेड आता जरा कमी झाले होते. तो आता सव्वीस वर्षाचा झाला होता पण त्याचं मानसिक वय हे अजूनही बारा वर्षाच्या मुला इतकंच होतं
आता मात्र प्रियाच्या आईला तिची काळजी वाटत होती. सागरला तिची खूपच सवय झाली होती. प्रियाच्या आईला आता ते आवडत नव्हते. शेवटी मेघना एका वयात आलेल्या मुलीची आई होती. तिला माहित होते की, प्रियाचे एक दिवस लग्न करावे लागेल आणि तिला हे शहर किंबहुना हा देश सोडून दूर जावे लागेल. प्रिया गेल्यानंतर सागरची मानसिक प्रकृती बिघडू नये असे तिला वाटत होते. त्यामुळेच ती प्रियाला सागरसोबतची मैत्री कमी करायला लावत होती. प्रियाला आईचे बोलणे समजले होते.
प्रियाने हि आता सागरला भेटणे कमी केले होते. मात्र सागरला ते मान्य नव्हते आणि प्रियाच्या आईला ज्याची भीती होती तेच झालं. एक दिवस तो स्वतः प्रियाच्या घरी तिला भेटायला गेला. तो बिल्डींगमध्ये गेला तेंव्हा शेजारपाजाऱ्यानी प्रियाच्या आईला बरेच प्रश्न विचारले. त्यांनी एक विचित्र कटाक्ष हि प्रियाच्या आईवर टाकला. जो तिच्या अनुभावी नजरेने हेरला होता.
प्रिया आता तेवीस वर्षांची झाली होती.