काय सांगते श्रीमद भगवदगीता
भगवद्गीता युद्धखोरीला खतपाणी घालते, म्हणून अलीकडेच रशियात तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.असे वाचले आजची स्थिती आपण बघतोय.
सुमारे पाच हजार वर्षांपूवी भगवान श्रीकृष्णानी मोहग्रस्त अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितली.आपल्याच माणसांशी कसे युद्ध करायचे असा प्रश्न होता.महान जीवनमूल्यांच्या संरक्षणाप्रीत्यर्थ व प्रतिष्ठेसाठी लढणं हे क्षत्रियांचे आद्यकर्तव्य आहे. जीवनमूल्ये पायदळी तुडवणारे, अन्यायाने वागणारे कितीही जवळच्या व्यक्ती असोत त्यांचे बलिदान देणे क्षत्रियाचे कर्तव्य ठरते असा गीता संदेश देते. मानवी जीवनाची विकसनशील परंपरा टिकून रहावीत अशीच तत्त्वे गीतेत सांगितली आहेत.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हा उपदेश क्षत्रिय श्रीकृष्णाने क्षत्रिय अर्जुनाला केलाय. कर्माच्या हेतूत मन गुंतवून फळाच्या आशेने कर्म करू नकोस. म्हणजेच वैयक्तिक भावनेवर विजय मिळवण्यास सांगितले आहे.
'नियतं कुरु कर्म त्वं।' तुझे कर्म तू कर असेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. ह्या जगात आपल्या वाट्याला आलेले कर्म केलेच पाहिजे. हा कर्मयोग भगवान श्रीकृष्णाने स्वत: केलेला आहे. अहिंसा हा सद्गुण असला तरी कधी कधी तो विकृती ही ठरू शकतो.
अपूर्णता, अनिश्चितता आणि अज्ञान. मानवाला कुठल्याही क्षेत्रात आणि व्यवसायात पूर्णता कधीच मिळाली नाही आणि मिळतही नाही. पूर्ण सुख नाही, पूर्ण यश नाही, आज आहे तर उद्या नाही. फक्त मरण सोडून मानवाचे सर्व जीवन अनिश्चित, अनित्य आणि अशाश्वत आहे. मरण सुद्धा केव्हा येणार याबाबतीत मानव अज्ञानी आहे. कोण, केव्हा आणि कधी संपेल हे कुणालाच सांगता येणार नाही. स्वार्थ, अहंकार आणि ढोंग हे पृथ्वीवरील मानवाचे तीन ठळक दुर्गुण आहेत.
अर्जुनाने श्रीकृष्णाला कधी गीता ग्रहण करताना प्रतिप्रश्न केला नाही कायम नम्र राहून त्याने एका विद्यार्थी च्या भूमिकेतून श्रीकृष्णाला आदरस्थान दिले एक अध्यापक म्हणून... ती आचराणात ही यायला हवी का असे शिकताना वाटले.16 वा अध्यायत नरकांचा उल्लेख येतो. भक्ताने कसे असू नये हे कृष्ण सांगतो.
गीतेची पार्श्वभूमी रणभूमी असली तरी संवाद हा धर्म कर्म आणि ज्ञान हाच आहे तसेच व्हावे तरच गीता आत्मसात करत आहोत
गीता जगूयात आचरणात आणूयात.
©मधुरा धायगुडे