स सकारात्मकतेचा...!!
सत्य, सातत्य,सचोटी,सकारात्मकता..अशा 'स' ने आपले आयुष्य साकारत पूर्णत्वास जाते. मनाच्या घरात त्यांचा वास हे सगळे 'स' आपल्याला सतत जागे करत असतातच.
आपणच आपल्या मनाचे मालक असता. आपल्या रोजच्या वापरात आपण आपल्या बोलण्यातून अनेक शब्द वापरतो
अनेक रूढार्थाने वापरण्यात येत असलेल्या म्हणी, वाकप्रचार एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरली जाणारी विशेषणं हे भाषेचे लालित्य तर दाखवतातच पण, एक छुपा आशावाद दर्शवणारा शब्द रूढार्थाने येतो तो म्हणजे सकारात्मकता. काय असते सकारात्मकता?
मग ही सकारात्मकता मनात रुजवण्यासाठी आपला आशावाद असतोच स्वतः च स्वतः ला समजावत आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती कितीही नकारात्मक असली तरी मार्ग काढत राहतो कारण दुसऱ्याला बदलण्याची ताकत आपल्यात नसली तरी आपल्याला आपली ताकत मर्यादा माहित असतात मग.. अशा वेळेस मनातील कटुता घालवताना एखादाने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचे स्मरण करावे त्याच आठवव्यात अशी सकारात्मक दृष्टी ठेवता येतेच... आपल्याला एखादा च्या कृतीने वागणुकीने त्रास झाला असेल होत असेल तर त्याला माफ जरूर करता येते पण ते विसरता येणे कठीण असते कधी कधी आयुष्य पणाला लागलेले असते अशा वेळेस त्या समहू व्यक्ती परिस्थिती पासून स्वतः ला लांब ठेऊन सकारात्मक वृत्ती जपता येतेच.
आयुष्य एकदाच...वाईट आठवणी विसरता येत नाहीत पण चांगल्या आठवणी चिरंतन जागृत रहाव्यात यासाठी संवाद ची गुरुकिल्ली महत्वाची यावर ही आपण बोललो आहोतच.
एक प्रसंग लक्षात आला सहजच बघा यातून ही काही मांडता येते का बघू या असा विचार....
दोन मित्र एका वाळवंटातून जात होते. त्यांच्यात थोडा वाद झाला आणि त्यातल्या ताकतवान मित्राने दुसऱ्याच्या मुस्कटात ठेऊन दिली. त्याने कांही न बोलता वाळूवर लिहिले, “आज माझ्या जिवलग मित्राने मला थोबाडीत मारली.”
दोघे चालत चालत एका तलावा पोचले आणि आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. दुसरा मित्र पाण्यात बुडायला लागला होता, पण पहिल्याने त्याला वाचवले. भानावर आल्यानंतर त्याने एका दगडावर एक वाक्य कोरले, “आज माझ्या जिवलग मित्राने माझे प्राण वाचवले.”
त्याने असा फरक का केला हे विचारल्यावर तो मित्र बोलला , “जर तुम्हाला कोणी दुखवलं तर ते वाळूवर लिहून ठेवा. क्षमेच्या एका झुळुकेसरशी ते पुसले जाईल, पण जर कोणी तुमच्यासाठी कांही चांगले केले तर ते दगडावर कोरून ठेवलेत तर कोणत्याही वाऱ्याने ते पुसले जाणार नाही.”
तुमचे नकारात्मक अनुभव मनातल्या वाळूवर आणि सकारात्मक अनुभव स्मरणाच्या दगडावर कोरायला हवेत.
सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर वाईटातूनही चांगले निर्माण होवू शकते. मनोवृत्ती सबळ करण्यासाठी योग्य निर्णय, वृत्ती यांची आवश्यकता असतेच कारण यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी खूप मोठी किंमतही मोजावी लागतेच
ती सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होण्यासाठी संगत ही अशाच सकारात्मक मनोवृत्ती असलेल्या माणसांची हवी.
'मला शक्य आहे', असा स्वतःशीच स्वतःचा संवाद ठेवला तर यश मिळेलच पण त्यासाठी एक स्वयं शिस्तबध्दता हवी. घाईने निर्णय घेणे टाळायला हवे स्वार्थी न बनता दुसऱ्यालाही आनंद देता यायला हवा त्यासाठी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहणे अशी मनोवृत्ती काढण्यास मदतच होईल. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण बऱ्याच नकारात्मक गोष्टी बोलत असतो. मला हे जमणार नाही, मला खूप कर्जाचा बोजा आहे अशी विधाने करताना त्यातील सकारात्मकताही बघायला हवी.
अशा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार मनोवृत्ती आनंदी ठेवण्यास मदत करेल. पण अवतीभवती नकारात्मक स्पंदने असताना आपले मन ही कुठेतरी विचार करणं थांबवत असावं अन त्या लहरी सोबत आपण ही आपली मनोवृत्ती बदलत जातो इतकेच यासाठी मला काय करायचे नाही हे एकदा ठरवले की काय करणार मी अशी सकारात्मकता येतेच.
जे मनाला पटत नाही ते स्वीकारुच नये त्यामुळे मनात गोंधळ होवून वृत्तीत कटुता निर्माण होते मनोवृत्ती ढासळते व नकारात्मक विचार मनाभोवती रुंजी घालतात स्वतःचे अस्तित्व नकळत धूसर होवू शकते. जे पेराल ते उगवेल या म्हणीप्रमाणे सकारात्मक विधाने यशाचा मार्ग मोकळा करतात.
शारीरिक व मानसिक पातळीवर चांगले तेच स्वीकारले तर होणारा मोबदला स्वतःला व समाजाला चांगलाच होईल वाईट विचार वाईटच कृत्य घडवतो तेव्हा मात्र त्यासाठी योग्य वेळेची गरज असतेच वाईटतही चांगले पाहण्याचा प्रयत्न अनेक शुभेच्छा व आशीर्वाद मिळवून देतात तीच आयुष्याची खरी शिदोरी त्यासाठी सकारात्मकता हवी, आपले विचार वृत्ती ठाम मूल्यावर्धित हवी. आजच्या पिढीसमोर ची प्रेरणास्थाने काय आदर्श काय हा ही एक विचार अशा विचारांसाठी हे महत्वाचेच असा ही एक विचार आला तो एक वेगळा विषय... अशी सकारात्मकता जोपसण्याचा प्रयत्न करता येईल...स सकारात्मकतेचा गिरवूयात..?!.
व्यक्तीसापेक्षतेचा आदरच.
©मधुरा धायगुडे