पु.ल. आनंदयात्री
व्यक्ती व्यक्तीमत्व यातीला फरकाची रेषा धूसर करणारं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे . वाचनाची गोडी लावणारे पु.ल.
पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल काय लिहणारं पण एक कृतज्ञता म्हणून लिहावेसे वाटले मी वाचलेले पहिले पुस्तक पु. ल. चे होते आणि पुस्तकच तुमचे खरे मित्र होवू शकतात ही जाणीव मला त्याच्या पुस्तकांनी दिली .
अष्टपैलू बहुआयामी व्यक्तीमत्व एखाद्या व्यक्ती ला नकळत समृद्ध करत जाणारा वस्तुपाठ पु. ल. देशपांडे.
एवढी प्रग्लभता विचारांचा साठा एखाद्या कडे कसा असू शकतो अस सहजच वाटलं उत्तम निरीक्षणशक्ती शिवाय हे अशक्यच .
मानवी स्वभावाचं आपल्या लेखणीतून सहज सोप्या शब्दात मिश्किलीने वर्णन करणारे पु. ल.देशपांडे व्यक्तिरेखांना ज्वलंत रुपकासारखं वाचकांसमोर आणतात अन् आपल्यातलेच होवून टाकतात हे वैशिष्ट्य ही गोष्ट भावली. मानवी मनातील भावना समोर आणणं यासाठी उत्तम निरीक्षणशक्तीच कारण मनात नसेल तर जनात कुठून दिसणार ही म्हण आहेच....
केवळ साहित्यिक च नव्हे तर वादक , संगीत दिग्दर्शक , पटकथा लेखन वक्ते अशा वैविध्य कलांना साकारणारे पु. ल. देशपांडे बहुढंगी व्यक्तीमत्व... बालपणी पहिला थिएटरला जावून पाहिलेला "देवबाप्पा" चित्रपट आठवला अन् त्यातलं ते "नाच रे मोरा आंब्याच्या बनात" हे गाणं तो नाच डोळ्यासमोरुन गेला मोर पिसारा फुलवून असा नाचतो हे तेव्हा प्रथम कळलेली मी ...! असो तर प्रत्येक कलेतून केवळ आनंदच देत राहिले पु. ल. देशपांडे .
दुःखाच्या क्षणी पु. ल. च एखाद पुस्तक हातात घेतलं की आनंदाने मूड परत ताजातवाना होवून जातो .
काही माणसं कधीच विसरता येत नाहीत त्यांच्या कामाने ती सदैव मनात चिरंतन राहतात त्यातीलच एक पु. ल. देशपांडे.
माझ्या निरीक्षणाला पु.ल. वाचताना लक्षात आले ते त्यांच्या कोणत्याही लिखाणाची कथेची सुरुवात आणि शेवट आनंददायी अशीच काहीशी शैली ...
मानवी मनाच्या प्रत्येक पैलूला हास्यानेच उलगडणारे पु. ल. जगण्याचे मानसशास्त्र शिकवून जातात "असलेल्या गोष्टीत रमता आलं कि नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही" मिळतो केवळ आनंद हेच त्यांच्या प्रतिभेचे गमक म्हणावे लागेल . मग यात अनेक व्यक्ती रेखा सखाराम गटणे , चितळे मास्तर, अन्तु बर्वा ,नारायणा सारख्या व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हे नकळत सांगून जातात.
वाचनाने समृद्ध होणे म्हणजे काय हे पु. ल. यांच्या पुस्तकांतून कळते फार अवघड न वाटता माझ्या सारख्या व्यक्ती लाही हे सहज उमगेल असेच त्यांचे सर्व लिखाण कर्तुत्व जनमानसाला रुचलेले भावलेले म्हणून चिरंतन स्मरणात राहते.
आजकालच्या अन् पुढील भावी पिढीला तेवढे समजायला हवे यासाठी वाचनसंस्कार हवा का ?? ही श्रीमंती त्यांच्यापर्यतही पोहचायला हवी असे वाटते.
सहजच मनात आले सध्या " तारक मेहता का उल्टा चष्मा " सारख्या सोप्या दैनंदिन मालिका आपण पाहतो तसचं काहीसं .,,अशा माध्यमातून पु.ल. चे साहित्य व्यक्तीरेखा भावी पिढीपर्यत दैनंदिन मालिकातून पोहचवता येतीलच की..पु. ल. चा वारसा पोहचवता येईलच ...हे माझं मत
वाचनातून मला भावलेले उलगडलेले पु. ल. देशपांडे केवळ पु.ल. किवा भाईकाका म्हण्याइतपत मी कुणी नाही म्हणून पु. ल. देशपांडे या नावातील स्पंदनेच ख-या अर्थाने समृद्ध करतात जगतानाचे प्रत्येक क्षणांचे आनंदयात्री....
प्रत्येक क्षण आनंदाने घालवायला हवा क्षणांचे सोने करता यायला हवे ...हेच पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातून मिळालेले सार मनाला परिपक्व करणारे पु. ल. देशपांडे ...खरे आनंदयात्रीच....!!
© मधुरा धायगुडे