Get it on Google Play
Download on the App Store

दोन

अनेक दिवस झाले प्राचीचा काहीच पत्ता नव्हता. प्रशांतच्या प्रत्येक मेसेजला ती ‘हं बोल न’ या वाक्याने सुरुवात करायची आणि ‘hmmmm’ या शब्दाने शेवट करायची. प्रशांतला राहून राहून ती गच्चीवरची रात्र आठवत होती. त्या नाजूक क्षणांबाबत अनेक मोठ मोठ्या कवींनी  अनेक कविता लिहिल्या होत्या त्या फक्त माझ्यासाठीच लिहून ठेवल्या आहेत असा प्रशांतचा पुरेपूर समज झाला होता. ते सुंदर क्षण अनुभवायला मिळाले म्हणून प्रशांत स्वत:ला खूपच भाग्यवान समजत होता.

कवी लोकं काय नुसत्या कविता करतात. त्यात बरेच वेळा व्यावसायिक दृष्टीकोन असतो पण त्यांनी ते क्षण प्रत्यक्ष अनुभवलेले असतातच असं नसतं. अनुभव असता तर घंटा कविता करू शकले असते. कारण प्रशांतला ते क्षण आठवले कि अगदी जग थिजून गेल्यासारखं वाटत होतं. अशात कविता बिविता काय सुचणार...

प्रशांतला असंही वाटत होतं कि त्याने एक चूक केली आहे. तिच्या ‘तू रेप करूच शकत नाहीस’ या वाक्यावर नक्की काय प्रतिसाद द्यायला हवा होता? प्राचीचा हात पकडायला हवा होता का? आणि एकदम फिल्मी स्टाईल मध्ये तिला प्रपोज करायला हवं होतं?

“नाही नाही बरं झालं तसं केलं नाही.” तो स्वत:शीच पुटपुटला

“ती रागावली असती किंवा घाबरली असती आणि तिने ओरडाआरडा केला असता तर? प्राचीने हिंट दिली होती का? शिट्ट यार काही कळत नाहीये. पण माझं काहीतरी चुकलंय हे नक्की. म्हणूनच तर ती माझ्याशी नीट बोलत नाहीये.”

प्राची त्याच्याशी बोलत नसल्यामुळे घड्याळाचे काटे पुढे सरकत नसल्यासारखे त्याला वाटत होते. 

इतक्यात प्राचीचा मेसेज व्हॉटसएप वर आला ‘Come fast. Am at home. In trouble.

प्रशांतचे मन कसल्याशा अनाहूत भीतीने भरून गेले. तो चटकन उठला आणि त्याने हातपाय धुतले. केसांचा नीट भांग पाडला. पावडर लावली. काखेत भरपूर डीओ मारला. आणि एकदम हिरो बनून तो जायला निघाला. हे सगळं त्याने मोजून पाच ते सात मिनिटातच उरकलं होतं.

दरम्यान त्याच्या व्हॉटसएप वर ‘??????” असे प्राचीचे किमान वीस मेसेजेस येऊन पडले होते. काही इमोजी होते ज्यावरून ती चांगलीच चिडली आहे हे सुद्धा लक्षात येत होतं. प्रशांत त्याच्या स्कुटीवरून तिच्याकडे पोचला. जाताना रस्त्यात तिला काय सांगायचं यासाठी काही कारणांची त्याने मनातल्या मनात जुळवाजुळव केली होती.

तो तिला सांगणार होता की

“मी आईचं काम करायला बाहेर गेला होतो. आईने काही दागिने दुरुस्तीला दिलेले ते घेऊन येण्यासाठी मला सोनाराकडे पाठवलं होतं. तुझा मेसेज जेव्हा मी पाहिला ना तेव्हा मी सोनाराला लगेच सांगितलं म्हणालो दादा आहे सामान ठेवून द्या अर्जंट काम आहे सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं! मी नंतर येतो चालेल ना? दुकानदार काय माझा मित्रच आहे त्यामुळे त्याच्या लगेच लक्षात आलं काम काय आहे तो ठिक आहे म्हणाला आणि मी आलो” असं वगैरे सांगून वेळ मारून नेणार होता.

प्रशांत जेव्हा प्राचीच्या घरी पोहोचला तेव्हा दरवाजा सताड उघडा होता. पण प्राची व्यतिरिक्त घरातलं अजून कोणीच नव्हतं. फक्त प्राची आणि तिचा बॉयफ्रेंड जतिन सोफ्यावर समोर बसला होता. जतिनच्या चेहऱ्यावर जबरदस्त राग आणि फ्रस्ट्रेशन दिसत होतं. प्राची अस्ताव्यस्त दिसत होती आणि तिचा चेहरा रडवेला झाला होता

प्राचीने प्रशांतला पाहिलं आणि म्हणाली

“प्लीज थोडा वेळ बाहेर थांबतोस का? माझी आई येताना दिसली तर लगेच सांग आम्हाला जतिन ऐकतच नाहीये त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं मी त्याला म्हणाले की आईने बघितलं तर आपल्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला मारुनच टाकेल”

आता यावर प्रशांत काय बोलणार? बाहेर एखाद्या चौकीदारासारखा बसला. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. ज्या प्राचीवर तो मनापासून प्रेम करतो त्या प्राचीला एखाद्या तिसऱ्याच मुलाच्या मिठीत जाताना पाहणं किंवा त्याची साधी कल्पना करणं सुद्धा त्याला सहन होण्यासारखी गोष्ट नव्हती. पण तो करणार तरी काय होता?

इथे यायच्या आधी त्यांनी काय काय विचार करून ठेवला होता आला की एकदम स्टाईल मध्ये आत येईल आणि मग प्राची त्याला फ्रीजमधून थंडगार पाण्याची बाटली आणून देईल. मग विचारेल

“तू काय घेणार? चहा की सरबत?” मग तो थोडेसे डायलॉग मारेल आणि मग प्राचीशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत तास दीड तास मस्त जाईल

मग त्याला प्राचीच वाक्य आठवलं दोघांपैकी एकाला मारुनच टाकेल दोघांपैकी एक कोण प्रशांत की जतीन या विचारानं त्याचं मन थरथर कापू लागलं.

प्रशांत बाहेर बसला होता. काही वेळात आतून ओरडाआरडा करण्याचा आवाज सुरु झाला. जतीन आणि प्राचीचे भांडण झालं असावं. तो दाराला कान लावून नीट ऐकू लागला आणि  इतक्यात खळकन काच फुटल्याचा आवाज झाला. प्रशांत पार गोंधळून गेला होता दरवाजा उघडून आत जाण्याची त्याची हिंमतच झाली नाही. इतक्यात दरवाजा धाडकन उघडला आणि जातील शिव्या देत बाहेर आला. त्याने प्रशांतकडे रागाने पहिले आणि दारात उभा राहून प्राचीवर ओरडू लागला

“यु आर आउट ऑफ माय लाइफ. इट्स ओव्हर!

प्राची सुद्धा  रागावून जोरात ओरडली “जस्ट गेट लॉस्ट।”

जतिन- “बिच.... यू आर ए कॅरेक्टरलेस बिच।”

प्राची- “ओह रिअली.. देन गो फ़क योरसेल्फ़।”

जतिन- “आय डोंट हॅव अ डर्थ ऑफ़ हॉट गर्ल्स। यू आर अ यूज़ेबल मटेरियल ल। आय डोंट गिव अ फ़क टू यू।”

प्रशांतला प्रश्न पडला होता कि प्रेमात शोना आणि बाबू म्हणून गुलुगुलू बोलणारे कपल्स ब्रेकअप करताना किंवा भांडताना फाडफाड इंग्लिशमध्ये का बोलतात.

जतीन गेल्यानंतर प्राची जोरजोरात रडू लागली . आणि जतीन जग जिंकल्यासारखा ना चेहऱ्यावर अत्यंत दुष्ट हास्य घेऊन चालत चालत घराबाहेर पडला. प्रशांतला क्षणभर वाटेल बाकीच्या जतीनला तिथल्या तिथे तुडवून काढावा पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात असाही विचार आला की उगीच प्रकरण पुढे वाढेल. आणि जतीन त्याच्यावर भारी पडला तर मार खावा लागेल. आणि समजा प्रशांत- जतिन आणि प्राची यांच्या भांडणात पडला असता आणि नंतर त्या दोघांचे मेतकुट झालं असतं तर हा तोंडावर पडला असता ते वेगळेच ! त्यामुळे प्रशांतने दुर्लक्ष करून गप्प राहणं पसंत केलं.

जतीन निघून गेल्यानंतर प्राची बराच वेळ प्रशांतच्या गळ्यात पडून रडत होती आणि शेवटी ती म्हणाली " आई यायची वेळ झाली आहे. आता तू घरी जा"

मग प्रशांत खाली येऊन त्याच्या स्कूटीवर बसून स्कुटी सुरू करणारच होता तितक्यात प्राची धावत त्याच्याजवळ आली. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली

"हे थँक्स फॉर एव्हरीथिंग! आय लव यू"

आणि प्रशांतला काही कळायच्या आतच तिने त्याच्या गालावर एक किस केला. या प्रकाराने प्रशांत पुरता भांबावून गेला होता.