८
“इंडक्शन पूर्ण झाले आहे, सर!”
अमितला विजेचा जोरदार धक्का बसला होता. अमित जमिनीवर पडला होता आणि त्याचा व्ही आर हेडसेट बाजूला पडला होता.
इतक्यात शशिधरन यांनी कॅबीन मध्ये प्रवेश केला.
“मिस्टर गोडसे, तुम्हाला दाखवलेल्या ८ महिन्यांच्या फ्युचर सिम्युलेशन वरून असे दिसून येते कि तुम्ही सायबेरियाड साठी खूप समर्पण देऊन परिश्रमपूर्वक काम कराल. पण ते काम करताना तुमच्या मनातल्या शनाया बद्दलच्या आकर्षणामुळे तुम्ही कामावर लक्ष देऊ शकणार नाही.”
“सॉरी सर! मला कल्पना नव्हती कि अशा प्रकारे पकडला जाईन.”
“डोंट वरी अमित! यु नीड टू गेट मॅरीड! लवकर लग्न कर...”
अमितच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तो शनाया कडे पाहू लागला. पण शनाया पुतळ्यासारखी स्तब्ध उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते.
“ती काही बोलणार नाही. मी तिला स्वीच ऑफ केले आहे.”
“शनाया, गो टू युर स्लॉट” अशी कमांड शशिधरन यांनी देताच शनाया निघून गेली.
“लुक अमित! शनाया ही या सायबेरियाड रिसर्च कंपनीचं एक सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे. ती एक रोबोट आहे. गोडसे! आपल्या रिसर्च सेंटर मध्ये सौंदर्य आणि कार्यक्षमता यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी अधिक अभ्यास केला जातोय. एखाद्या सुंदर सहकाऱ्यासोबत काम करण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे कामाचे तास तर वाढतात, परंतु नंतर काम करताना त्या सहकाऱ्यावर मन केंद्रित असताना मन विचलित झाल्यामुळे कार्यक्षमतेत सतत घट होते. तुझ्या बाबतीत असंच झालं. आय सजेस्ट लग्न कर! शनाया परफेक्ट लेडी आहे. पण ती रोबोट आहे. माणूस नाही.”
अमित टी. शशिधरन याचं म्हणणं आ वासून ऐकत होता.
पुढे शाशिधरन यांनी अमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले.
“असो, वेलकम टू सायबेरियाड. सी यु टूमॉरो मिस्टर गोडसे!"
समाप्त
लेखक: अक्षय मिलिंद दांडेकर
हि विज्ञानकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा.