७
आता अमित पुण्यात चांगलाच रुळला होता. अजूनही त्याचे शनायाला पटवण्याचे प्रयत्न सुरु होते.
"शनाया?"
"येस सर."
"अमित म्हण ना मला."
"नाही, सॉरी सर. नको"
"या सहा महिन्यांत तू मला एकदाही त्या नावाने हाक मारली नाहीस. माझ्या सततच्या सांगण्या नंतरही. शनाया, तुला कल्पना नाही... मला तू किती हवी आहेस."
"मला माहीत आहे, सर. मी तुमच्यासोबत गेले ७ महिने १६ दिवस काम करत्ये."
“तू अशी का वागत्येस, शनाया, तू माझ्यापासून सतत अंतर ठेवतेस. मी खूप प्रयत्न केला पण तू माझ्या जवळ येत नाहीस"
"सर, मी तुमच्या जवळच आहे.”
"शनाया, तुला माझं मन, माझ्या भावना कधीच समजल्या नाहीत... अजिबात समजल्या नाहीत. मी तुझ्यासाठी झुरतोय, फक्त तुझी स्वप्न पाहतोय. मला तू माझ्या जवळ हवी आहेस.”
"हो सर, पण तुम्ही हे काय करताय.? तुम्ही मला असा का स्पर्श करत आहात?"
"शनाया, मी तुला स्पर्श केल्यावर कसं वाटतं?"
"कसं म्हणजे? तुम्ही स्पर्श करताय... अगदी एखाद्या नॉर्मल स्पर्शासारखे... सर, हळू...सर मी खाली पडेन, सर, माझा तोल जातोय... तुम्ही माझ्या चेहऱ्याला आणि ओठांना का स्पर्श करताय?"
"मिस... शनाया... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!"
"प्रेम? मी निघते सर. सहा वाजलेत."
"मग काय झालं, मी तुला घरी सोडतो. नाहीतर असं कर ना शनाया आज तू माझ्या घरी चल मी... मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..."
"हे काय... हे काय करताय सर! सोडा... मला सोडा.”
अमितने शानायाच्या ओठांवर आपले ओठ टेकवले मात्र आणि काही कळायच्या आत अमित धाडकन जमिनीवर कोसळला.