भाग-५
दार गदगदा हलू लागले. सर्वजण मागे झाले.
"मी पुन्हा एकदा सांगत्ये की आपण येथून निघून जाऊ , आपला जीव धोक्यात आहे" आकांक्षा रडत म्हणाली.
मग राजेश म्हणाला
"आपण सर्वांनी प्रथम आजूबाजूला पाहूया, जर आपल्याला जायला रस्ता दिसला तर ठीक आहे.... वाडा तर उघडा आहे, पण मेन गेट बंद आहे त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही."
"हे बघ राजेश, ही दिंडी उघडते" मेन गेटच्या वर असलेल्या दिंडीकडे बोट दाखवत सोनिया म्हणाली,
रियाने विहिरीजवळ पडलेला जाड लोखंडी रॉड उचलून दिंडीला ढकलले, तेव्हा दिंडीच्या फटीतून एक मोठ्ठा सरडा बाहेर आला आणि सरपटत जाऊन कुलपाला चिकटून बसला. तो भयंकर सरडा पाहून रियाही पळत सुटली आणि सोनियाच्या मागे लपली.
“शब्बास!… मी तुला माझ्या मागे राहायला सांगितले आहे ना”
राजेश रागाने म्हणाला.
मग राजेशने खिशातून बंदूक काढली आणि कुलूप गोळीने उडवले. रिया, सोनिया, आकांक्षा आश्चर्यचकित होऊन राजेशकडे पाहू लागल्या.
"सॉरी... सेफ्टी साठी आणावीच लागली!" बंदुक खिशात टाकत राजेश म्हणाला.
राजेशने लॉकवर गोळी मारल्यामुळे आकाश घाबरून उडणाऱ्या पाखरांनी भरून गेले. कुलूपाचे दोन तुकडे झाले आणि गेटची कडी तुटली. राजेशने लोखंडी रॉडच्या सहाय्याने कुलूप काढून गेट उघडण्याचा प्रयत्न केला.
“हे महाकाय गेट असे उघडणार नाही, आपण सर्वांनीच ढकलले पाहिजे” राजेश गेटला जोर लावत म्हणाला.
त्या चौघांनी जोर लावून गेट ढकलताच दरवाजा उघडला आणि समोर एक कळकट पडदा होता, खूप घाणेरडा! राजेशने पडदा एका बाजूला सारला. पुढे जाऊन ते पाहू लागले त्यांना दिसले कि आतून छताला वटवाघळं लटकत होती, एक मोठे महाकाय जाळे ज्यात एक भलामोठा कोळी होता. भरपूर खोल्या होत्या आणि गोल जिन्याच्या पायऱ्या होत्या.
सुरुवात कुठून करावी तेच त्यांना समजत नव्हते, मग राजेश आपोआप एका भिंतीकडे सरकला. त्याला असे वाटले की कोणीतरी त्याला खेचत आहे. लोखंडी रॉड घट्ट धरून सावरून उभा राहण्याचा त्याने प्रयत्न केला, तेव्हा त्याला कोणीतरी भिंतीवर बांधलेल्या मोठ्या सिंहाच्या मुंडक्याकडे ढकलले आणि राजेश अचानक गायब झाला.
रिया, आकांक्षा आणि सोनियाला वाटले की राजेश मागे उभा आहे.
तेव्हा आकांक्षा म्हणाली, "ही कोणाची सावली आहे, राजेश कुठे आहे"
तेव्हा रिया आणि सोनिया दोघींनी मागे वळून पहिले त्यांना सावली दिसली पण राजेश दिसला नाही. त्या तिघी घाबरून पळत दरवाज्याकडे जाऊ लागल्या. इतक्यात दार आपोआप बंद झाले. त्यांची भीतीने पार गाळण उडाली