धोंडे वाढावयाचे का थांबले?
फार पूर्वी एकदा असे झाले की धोंडे आकाराने वाढावयास लागले.
तेव्हां आतां अनर्थ होणार असे पाहून एक ब्राह्मण त्यांना म्हणाला
मी तुम्हाला बायको पाहून आणतो.
तोपर्यंत तुम्ही वाढू नका. असें म्हणून तो जो गेला तो कांहीं परत आला नाही.
आणि तेव्हापासून धोंडेही वाढायचे थांबले.