मोराचे पाय
फार पूर्वीची गोष्ट. त्यावेळी मोराचे पाय आतां सारखे धोबड नव्हते. सर्व शरीराप्रमाणे सुंदर होते.
एकदां टिटवाला पाहुणे जायचे होते. पण तिचे पाय होते विद्रुप तेव्हां ती मोराकडे गेली व म्हणाली
" मला पाहुणे जायचे आहे. मला तुझे पाय दे. परत आल्यावर तुझे मी तुला देईन."
मोर भोळा होता त्याने आपले पाय टिटवीला दिले. पण लबाड टिटवी तेव्हां जी गेली ती पुनः मोराकडे आलीच नाही
म्हणून मोर नाचूं लागला की त्याची नजर पायांकडे जाते व आपले ओबडधोबड पाय बघून त्याला दुःख होते.
आपले विद्रूप पाय बघून त्याला रडू येते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागतात.
तेच लांडोर झेलते व तिला गर्भ राहातो.