गहूं आणि हरभरा
एके दिवशीं गव्हाचे व हरभऱ्याचे भांडण लागले. तूं मोठा की मी मोठा.
गहूं म्हणे भी श्रेष्ठ. हरभरा म्हणे मी श्रेष्ठ.
भांडण कांहीं मिटेना.
तेव्हा ते दोघे न्याय मिळण्यासाठी इंद्र सभेला गेले.
इंद्र म्हणाला 'मला बुवा हरभराच बरा वाटतो. उचलला की टाकला तोंडांत.
गव्हाला व्याप किती. भाजायचा पीठ करायचे आणि मग पोळी करून खायची.
ते ऐकतांच हरभऱ्याला इतका आनंद झाला की त्याची छाती वर आली.
गव्हाला मात्र फार वाईट वाटले व त्याने उरांत सुरी भोसकून घेतली.
त्याची खूण अजून गव्हावर दिसते.