शहाण्या व्यक्तीचे लक्षण
मुहम्मद जफर सादिक एक महान संत होते.
एके दिवशी त्यांनी एका व्यक्तीला विचारले, "खरा शहाणा कोण?"
ती व्यक्ती म्हणाली, "जो कोण चांगले आणि वाईट काय याची पारख करू शकते तो ."
संत सादिक याला म्हणाले, "हे काम तर जनावरे देखील करतात कारण जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ते त्यांची सेवा करतात, ते त्यांना चावत नाहीत आणि त्यांना हानी पोहोचवत नाहीत. याउलट जे त्यांना हानी पोहोचवतात, ते त्यांना सोडत नाहीत."
संत मुहम्मद जफर सादिक यांचे हे म्हणणे ऐकल्यावर ती व्यक्ती म्हणाली," महाराज, मग तुम्हीच स्वतः मला शहाण्या व्यक्तीचे लक्षण सांगा."
मग संत म्हणाले, "वत्स, शहाणा माणूस तो आहे जो दोन चांगल्या गोष्टींमध्ये चांगली गोष्ट कोणती आणि दोन वाईट गोष्टींमध्ये कोणती गोष्ट अधिक वाईट आहे हे जाणून घेऊ शकतो?
जर त्याला चांगली गोष्ट बोलायची असेल तर त्याने जी गोष्ट अधिक चांगली आहे ती बोलावी आणि जर वाईट गोष्ट सांगण्याचा नाईलाजच असेल तर त्याने जे कमी वाईट आहे ते सांगावे आणि जो गोष्ट अधिक वाईट असेल ती टाळावी.”
संत सादिक यांनी दिलेली शहाणपणाची व्याख्या त्याला पटली आणि ती व्यक्ती सहमत त्यांच्याशी सहमत झाली.