आईची महानता
स्वामी विवेकानंदांना एका विद्यार्थ्याने विचारले, "स्वामीजी, आईच्या महानतेला जगात इतके महत्त्व का दिले जाते?"
स्वामीजी हसले आणि म्हणाले, "आधी तुम्ही पाच किलोचा दगड गुंडाळून घट्ट तुमच्या कंबरेला बांधून घ्या आणि नंतर चोवीस तासांनी माझ्याकडे या, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन."
त्या माणसाने तसे केले, पण काही तासांनी तो विवेकानंदांजवळ आला आणि म्हणाला, "स्वामीजी, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला म्हणून मला तुम्ही एवढी मोठी शिक्षा का दिली?"
विवेकानंद म्हणाले, "तुम्ही काही तास सुद्धा या दगडाचा भार सहन करू शकत नाही आणि आई नऊ महिने मुलाचा भार सहन करते. या ओझ्याबरोबर ती देखील काम करते आणि कधीही विचलित होत नाही. कोणीही यापेक्षा अधिक सहनशील असू शकत नाही. म्हणून आई महान आहे."
त्या विद्यार्थ्याने स्वामीजींचे पाय धरले आणि आशीर्वाद घेतला.