Get it on Google Play
Download on the App Store

प्रेमाचे अश्रू

एक महात्मा हिमालयावर राहत होते. एके दिवशी काही लोकांचा एक गट त्यांच्याकडे पोहोचला. त्यांनी महात्म्यांना आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग विचारला.

महात्मा म्हणाले, “सांसारिक आसक्ती आणि भ्रमात अडकून आध्यात्मिक प्रगती साध्य होऊ शकत नाही. लोक जगाच्या भ्रमात अडकतात आणि त्यांच्या आत्म्याला मुरड घातली जाते."

मग महात्म्यांनी त्यांना विचारले," तुम्ही गोमुखला जाल का? माझा एक शिष्य तिथे राहतो. त्याला भेटा पूर्वी तो माझ्याबरोबर राहत होता, पण तो मला सोडून निघून गेला. मला माहित नाही की ते आता कसे असेल? "

हे सांगताना महात्माजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. महात्माजींच्या डोळ्यात असे अश्रू पाहून एक सदस्य म्हणाला,

" महाराज, आता तुम्ही आम्हाला आसक्ती सोडायला शिकवत आहात, पण तुम्ही स्वतः आसक्त आहात.मोहात अडकला आहात  "

यावर महात्मा म्हणाले," बाळा माझे अश्रू आसक्तीचे नसून प्रेमाचे आहेत. मोह जडतो, तर प्रेम वाचवते. "