स्वाभिमानी संत लीत्सू
चीनमध्ये लित्सू नावाचा एक संत राहत होता. तो इतका गरीब होता की कधीकधी त्याला आणि त्याच्या पत्नीला उपाशी झोपावे लागले. तरीही लित्सुने कधीही कोणासमोर हात परसले नाही.जे काही त्याने कष्टाने कमावले, ते त्यातून उदरनिर्वाह करायचे. त्यांचे नाव त्यांची विद्वत्ता, साधेपणा, प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होते. तेथील राजाही त्याच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाला.
एक दिवस मंत्री राजाला म्हणाले, "राजन, आपण लित्सू याला आर्थिक मदत केली पाहिजे."
राजाने लगेच आदेश दिले आणि अन्न आणि पैशांनी भरलेली गाडी पाठवली. हे पाहून लित्सुच्या पत्नीचे डोळे आनंदाने चमकले. त्यांना वाटले की आमचे वाईट दिवस गेले आहेत. आता आपल्याला उपाशी झोपण्याची गरज नाही.
राज सेवक लित्सुला म्हणाले, "महात्माजी, आमच्या राजाने तुमच्यासाठी देणगी पाठवली आहे. कृपया ती स्वीकारावी "
लित्सु म्हणाला, "राजाशी माझा कोणताही परिचय नाही. त्याने मला किंवा मी त्याला आजपर्यंत पाहिले नाही. माझ्याबद्दल जे ऐकले त्यावर दान पाठवले आहे. समाधान, कष्टाने कमावलेल्या पैशातून मिळणारा आनंद हा काही औरच असतो. तो आनंद तुमच्या राजाने पाठवलेल्या मदतीच्या पैशात मला मिळणार नाही”
असे म्हणून लीत्सू यांनी ती गाडी परत घेऊन जाण्याची विनंती केली आणि सेवक ती रोकड घेऊन आल्या पावली परत गेले.