प्यार का दर्द (भाग 2)
ती त्याच्यावर किती प्रेम करते हे जाणून होता. चारु पूर्णपणे त्याच्या कंट्रोल मध्ये होती. त्यामुळे अमोघ चे हे असले बालिश प्रकार तो चांगलेच ओळखून होता. पण चारु ला आवडते गाणं गायला तिचा तो छंद आहे म्हणून त्याने मिलिंद सोबत काम करायला काही ही हरकत घेतली नवहती आणि तो ही लक्ष ठेवून असायचा. आज पाच दिवसांनी चारु ने आदी ला कॉल लावला तिला करमत नसायचे त्याच्या शिवाय. मग त्याने ही जास्त आढेओढे न घेता तिला भेटायला बोलवले. डिनर ला ते आले होते. आदी आय सॉरी . असू दे नको सॉरी बोलूस पण पुन्हा अस करायचं नाही समजलं. नाही करणार ओके. बाकी काम कस चालयय तुझं आणि रिहर्सल ? काम ठीक आणि रिहर्सल छानच. आदी तू या प्रोग्रॅम ला येणार आहेस . बघू मला वेळ मिळाला तर नक्की येईन. असे रे काय वेळ काढ ना माझ्यासाठी आदी. हे बघ असा हट्टी पणा केलास तर मी अजिबात येणार नाही समजलं. अरे पण नेहमीचच असत तुझं . नुसतं काम आणि कामच माझ्या साठी वेळ नसतो तुला. आता आलो नाही का . ते तुला ही भेटायच होतच की . हम्म बघू मी नक्की नाही सांगत. पण प्रयत्न तरी कर ना. परत परत तेच बोलू नकोस . बर चारु म्हणाली.
हा परत चिडला की लवकर ऐकत नाही असा विचार करून चारु गप्प बसली. मग दोघांनी जेवण केले . कार मध्ये ते बसले तसे चारु बोलली आदी एक विचारू बोल काय . तू असा वागतोस. मला किती रूड बोलतोस . मी नेहमी चुकीचेच वागते का? हे बघ हा माझा स्वभाव आहे. माझे बोलणे रूड असले तरी ते तुझ्या भल्या साठी असते समजले. आणि इतकाच जर तुला त्रास होत असेल तर कशाला हे रिलेशन ठेवले आहेस तुला जायचे तर जा. हेच असच बोल तू कायम. मी सहज विचारले ना आदी लगेच का वेगळा अर्थ घेतोस. तू बोललीसच तसे चारु. मला त्रास होतो तर जा अस कस बोलू शकतोस तू मी प्रेम करते तुज्या वर. मग मी ही काही टाईमपास करत नाही आहे. मग जरा तरी सॉफ्ट वाग ना. मला जमत नाही समजलं मी आहे असा आहे बघ कर विचार. तुज्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असं बोलून चारु रडू लागली. आदी ने पाहिले तसा तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले चारु अरे मी तुला हर्ट करायचे म्हणून अस बोललो नाही . तू समजून घे ना मी असाच आहे ग. पण जितका त्रास देतो तितकेच प्रेम ही करतोच ना मॅड डम्बो.चारु त्याच्या कुशीत शिरून बोलली माहीत आहे म्हणूनच खूप आवडतोस मला. मी नाही राहू शकणार तुज्या शिवाय. त्याने तिला बाजूला केले हे बघ मी कसा ही असलो तरी तुझाच आहे मी तुला कंट्रोलमध्ये ठेवतो ते तुझ्या भल्या साठी आणि त्या अमोघ पासून सांभाळून रहा जरा. हो माहीत आहे उगाच मागेमागे करत असतो माझ्या. हम्मम चल निघुया का आता.
आदी तिने आवाज दिला.काय त्याने विचारले. तसे चारु ने आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवले. त्याने मग तिचे दीर्घ चुंबन घेतले. त्याच्या पासून दूर जाऊच नये असं तिला वाटत होतं. कारण खूप कमी वेळ ते एकत्र भेटायचे . आदी ची फर्स्ट प्रायरीटी होत काम मग बाकी सगळं. मिलिंद ला अजुन एक कार्यक्रम मिळाला होता पण तो मुंबई ला होता त्याने चारुला विचारले करणार का प्रोग्राम कारण पुण्या बाहेर आहे सो. चारु ने आदि ला विचारले तर तो बोलला पुणे सोडून बाहेरच्या कार्यक्रमाला जायचे नाही ते सेफ नाही या वरुन ही चारु ने वाद घातला होता सगळे फ्रेंड्स तर आहेत सोबत तरी का नको बोलतोस. आदि म्हणाला होता जरी फ्रेंड्स असले तरी कोण कसा वागेल नाही सांगता येत तुझ त्यांच्या सोबत जाण सेफ नाही इथे पुण्यात मी आहे लक्ष द्यायला .दोन दिवसांनी चारु चा पुण्यात प्रोग्राम होता . संध्याकाळी होता त्यामुळे आदि कार्यक्रमाला येतो म्हणाला पन अचानक त्याला काही काम निघाले त्यात त्याला लेट झाला. चारु परत नाराज झाली. तुला माझ्या साठी वेळ नसतो तू फ़क्त काम च कर आदि अस ख़ुप काही त्याला बोलली.
त्याने ही ऐकुन घेतले पन ती जास्तच बोलत होती मग आदि आउट ऑफ कंट्रोल झाला. चारु मी गप ऐकुन घेतो आहे म्हणून तू वाटेल ते बोलू नकोस. मी मुद्दाम केले नाही समजले. बास या पुढे एक शब्द ही बोलू नकोस. म्हणत त्याने कॉल कट केला. याला गरज नाही माझी फ़क्त मलाच आहे त्याची गरज. मला आहेत त्याच्या बद्दल फिलिंगज पण त्याला नाहीत असा विचार चारु करत होती. तिने ही ठरवले की आता तोच सव्हता हुन बोलू दे मी बोलणार नाहीच. असेच आठ दिवस होऊन गेले. ना आदि सव्हता हुन बोलला ना चारु. पण चारु त्याला ख़ुप मिस करत होती. वेड्या सारखे प्रेम करत होती ना आदि वर. दोघ अगदी नो कॉन्टैक्ट मध्ये होते. मिलिंद ने त्यांचा शो छान झाला म्हणून पार्टी ठेवली होती. रात्री सगळे डिनर ला जाणार होते. चारु नाही येत म्हणत होती पन मिलिंद ने तिला फोर्स केला आदि ला ही बोलवले आहे असे सांगितले. तेव्हा चारु बोलली तो येतोय तर मी नाही येत. मिलीद म्हणाला त्याच् काही नक्की नाही तो बघू बोलला आहे पन तू मात्र नक्की ये. चारु मग मुद्दाम गेली .
क्रमश: