Get it on Google Play
Download on the App Store

डेटिंग अँप

सविता रूम मधये आली. वरुण अजून बाहेरच होता. आज त्यांची पहिली रात्र होती. सविता च्या मनात विचारांचे काहूर माजले होते. वरुण आत आला. सविता ला अस टेन्शन मध्ये बघून तिच्या जवळ बसला म्हणाला,कसला विचार करतेस इतका आज चा दिवस तुझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे ना सावू. हो वरुण पण मला बोलायचे आहे तुझ्याशी थोडं. अग बोल ना मग जे मनात आहे ते सगळं बोल. वरुण तुझं माझ्या वर प्रेम आहे तू माझी काळजी ही घेतोस . माझं ही प्रेम आहे तुझ्या वर पण मला थोडा वेळ हवा आहे रे. तुला तर सगळं माहीत आहे माझ्या बाबतीत. हो सावू मी काही बोललो का त्या बद्दल मी प्रेम केलंय तुझ्या वर तू जशी आहेस तशी मला हवी आहेस. तू तुझा हवा तेवढा वेळ घे माझी काहीच हरकत नाही. माणूस आहोत आपण मग चुका ही होणारच ना त्या चुका मधून धडा घेऊन पुढे जायचं हेच जीवन असत. वरुण इतका समजूतदार पणा कसा काय रे तुज्या कडे. इतकं मोठं मन कस कोणाचं असू शकत? सावू नको आता कसला विचार करू आणि मी कोणी मोठा महात्मा वैगेरे नाही आहे. तू यातून बाहेर येशील मला खात्री आहे. माझं प्रेम तुला सगळ्या जुन्या गोष्टी विसरायला भाग पाडेल. तू झोप नको काळजी करू. थँक्स वरुण म्हणत सावू आपलं आवरायला गेली.सविता झोपायला आली पण वरुण चा विचार करत राहिली . आपल्या मुळे त्याच सुख ही आपण हिरावून घेतल. लग्नाच्या पहिल्या रात्री आणि अजून अशा किती रात्री आपण त्याला त्याच्या हक्का पासून दूर ठेवणार आहोत नाही माहीत!. सविता ला तिचा भुतकाळ नजरे समोर दिसू लागला. हॉस्टेल ला रहात होती सविता आई वडील लहानपणी गेले. मामा कडे राहिली मग कॉलेज साठी हॉस्टेल वर राहू लागली. काम करत शिकत होती. सहज गंमत म्हणून तिने डेटिंग अँप वर प्रोफाइल ओपन केले होते आणि हळूहळू तिला त्याची सवय झाली. अनेक मुलांना ती डेट करत होती. तरुण वय मग सेक्स ची ही चटक लागली.  वासनेच्या खोल डोहात ती बुडत चालली होती. तिला हे सगळं हवेहवेसे वाटत होते.मुलांना काय सहज सावज मिळतय तर का सोडतील ते. सविता शी ते पॉर्न फिल्म बघून तशीच डिमांड करायचे . सेक्स ची क्रेज आणि त्यातले थ्रिल तिला आवडु लागले. सुरवातीला सगळं छान वाटत होते. पण नंतर नंतर त्यातल्या अनैसर्गिक सेक्स ची तिला किळस वाटू लागली. या सगळ्या वरून तिचे मन उबगले. मग तीने असे डेटिंग करणे बंद केले पण सेक्स विषयी ची घृणा कायम मनात बसली तिच्या. वरुण तिच्या प्रेमात पडला तेव्हा तिने त्याला सगळं काही खर खर सांगितले तरी ही वरुण ने तिच्या शी लग्न केले. कारण त्याच खरच प्रेम होतं सविता वर. चुका माणसा कडूनच होतात हे त्याला माहित होत. सविता ला प्रेम नाही मिळाले म्हणून ती या मार्गाला गेली. अस त्याला वाटत होतं. वरुण खूप काळजी घ्यायचा सविता ची. प्रेम ही करायचा.  कारण त्याला ही तिच्या शिवाय दुसरं कोणी नवहते. वरुण अनाथ होता.पण आपण त्याला बायको म्हणून हवे ते सुख नाही देऊ शकत कारण तिला सेक्स ची किळस वाटत होती. ही खंत तिच्या मनात होती. वरुण ने तिला स्पर्श केला तरी तिला काहीच वाटत नसे जणू तिच्या त्या भावना गोठून गेल्या होत्या.  लग्नाला दोन महिने झाले होते आता तिला हे सहन होत नवहते. आज वरुण शी बोलायचेच असे तिने ठरवले. वरुण घरी आला तेव्हा ती म्हणाली ,वरुण अस किती दिवस चालणार ? तू माझ्या साठी स्वहताच्या भावना का दाबून ठेवतो का मन मारून जगतोस? मी तुला शरीरसुख नाही देऊ शकत कधी देईन हे पण माहीत नाही . मग का उगाच तुझं आयुष्य बरबाद करतोस तू मला घटस्फोट दे आणि दुसरे लग्न कर. असे बोलून सविता रडू लागली. सावू माझं प्रेम आहे तुझ्या वर आणि मला घाई नाही ग. डॉक्टर पण बोलले ना की हळूहळू तू यातून बाहेर येशील. मी आहे ना सोबत तुझ्या. वरुण पण किती दिवस असा तू या सुखा पासून वंचित राहणार ? मी वासनेच्या आगीत नको ते  पाऊल उचलले आणि माझ्या बरोबर तुझं ही जीवन बरबाद करतेय मला नाही बघवत तुझे हाल. या वासने पायी मी प्रेमा सारखी सुंदर गोष्ट गमावली. मला नको वाटत रे काहीच पण तू का सहन करतोस जा मला सोडून वरुण प्लिज तुला सुख नाही लाभणार. सावू तुला सोडायचे असते तर लग्नच केले नसते मी. तू नको कसला विचार करुस जे झालं ते झालं . तो भूतकाळ होता विसरून जा. वरुण म्हणत सविता ने त्याला मिठी मारली. तू जशी आहेस तशी मला आवडतेस . आपण मनाने एकत्र आहोत ना मग शरीराच पण मिलन होईल . सविताने समाधानाने त्याला अजून घट्ट मिठी मारली.

समाप्त.