अपेक्षा (कविता)
कशाची आता अपेक्षा करावी.
काटेरी वाटेवर फुले उमलावी.
आपलेच आपल्या पासून दूर जातात,
मग कशाला नात्यांची गुंफण जोडावी.
जीव लावला म्हणतात मनापासून,
मग एकाच्याच मनात का प्रीत उमलावी?
भावनाना शब्द नसतात, ना असते जाणीव,
कशाला खोट्या शपथेत नाती जखडावी?
दूरवर वाट ही अशीच निशब्द पडून आहे,
का आणि कोणासाठी मी वाट पहावी.
खूप काही साचलय मनात आतल्या आत,
लिहू कुठे आणि कसे शब्दच मला भुलवी.
आपलाच जीव जळतो इथे,नाही फरक पडतो कोणाला,
ऐकले होते कुठेतरी प्रेम म्हणे वसते हृदया जवळी.
सार काही खोटंच मनच मनाला भुलवी.
समाप्त