एक आई अशी ही
कमला झाली का साफ सफाई सगळी मंदिराची ? आणि ऐक तुझे काम झाले की खोली वर ये आज शहरातुन एक मोठे साहेब येणार आहेत आपल गाव बघायला ते आपल्या गावाला निधी मिळवून देणार आहेत . पुजारी कमला ला सांगत होता . म्हणजी मला नाय समजल कमला बोलली. तू अडाणी तुला काय समजतय तू फ़क्त काम उरकुन ये खोली वर आणि साहेबांना खुश कर बाकी मी बघतो. येते म्हणत कमला काम करत राहिली. कमला कर्नाटक जिल्ह्यातील एका छोट्या खेडयात राहत होती. ती एक देवदासी होती. गावा बाहेर त्यांची वस्ती होती.मंदिराची साफ सफाई करने आणि गावात जोगवा मागत फिरने हे तीच काम होत.तिच्या केसात झटा होत्या म्हणून ती जोगतिन असे असायचे.पुजारी आणि गाव प्रमुख बोलवतील तेव्हा त्यांची शय्या सोबत करन हेच तिचे काम. त्यांचा शब्द मोडला तर आपली काही खैर नाही हे ती जाणून होती म्हणूनच पुजारी ने खोली वर बोलावले की जाण भाग असायच. देवाशी तीच लग्न झाल होत पन देवाच्या नावा खाली पुजारी आणि गावप्रमुख यांची वासना ती पूरी करत होती. असे पण देवदासी म्हणजे गावाला वाहेलेली आणी मोठ्या श्रीमंत लोकां साठी मजा मारण्या साठीच असे. मंदीरातील काम आटपुन कमला घरी आली. तर तिची मुलगी राधा अजुन घरी आली नव्हती राधा गावा जवळ वेशी पाशी एका पारावर शाळा भरत असे तिथे जात होती.एक मास्तर यायचे आणि खास देवदासिच्या मुलाना शिकवत असायचे. कारण देवदासिच्या मुलाना गावच्या शाळेत प्रवेश नसायचा. आपण अडाणी राहिलो पण पोरगी लिहायला वाचायला तरी शिकु दे म्हणून कमला राधा ला मास्तर कड़े पाठवत होती. राधा आली तसे कमला ने तिला जेवायला वाढले आणि सव्हता ही जेवली. पोरी मी जावून येते तवर तू शालू कड़े खेळत बस कमला म्हणाली. आई सारखे कुठे जात असती ग तू कधी दिवसा कधी रातच्याला. दहा वर्षाच्या लेकी ला कमला काय सांगनार होती कि ती कुठे जाते काय करते. वाईच काम आहे पुजारी कड़े त्याचं काम करून येते. कमला राधा ला शालू तिची शेजारीन कड़े ठेवून गेली. वाटेत हाच विचार करत होती की कसल हे जिण आपल राधा चा बाप कोन हे पण माहित नाही. आपल उद्या काही बर वाईट झाले तर राधाचे काय होणार? आपली पोर म्हणजे तिला पण उद्या जोगतिन बनाव लागल तर ती पण आयुष्य भर असच पुजारी आणि प्रमुखाची भूक भागवनार? नाही माझी पोर गुणी आहे दिसायला सुंदर आहे तिला असल यातना देणार जीवन नको. तिला नाही करायची जोगतिन नाही गावा साठी तिला सोडायची. तिला शिकुन चांगल काम करू दायच असल वंगाळ काम नको. पण हे पुजारी,गाव वाले आपल ऐकतिल का? कोन मदत करील मला माझ्या लेकीला यातून बाहेर काढ़ायला? असा विचार करत करत कमला खोली कड़े आली. ही खोली फ़क्त या कामा साठीच वापरली जायची. पुजारी आणि कोणी तरी साहेब तिथे बसले होते. कमला गेली. तसा पुजारी बोलला साहेब ही कमला जोगतिन आणि कमला हे मोठे साहेब आहेत मी जातो आता म्हणत पुजारी निघुन गेला. कमला तरुण सावळी पण देखणी होती. साहेब तिला बघूनच खुश झाला. मनसोक्त त्याने तिला उपभोगले . संध्याकाळी कमला घरी आली. तिच्या डोक्यात दुपार चे च विचार घोळत होते. कमलाने राधा ला हाक मारली.राधा आली मग जेवन करून राधा मास्तरांनी दिलेला गृहपाठ करत बसली. मग कमला ला सूचले की आपण राधाच्या मास्तर ला भेटू आणि सांगू आपली मदत करायला. उद्याच जाते राधा बरोबर असे ठरवून कमला झोपी गेली. सकाळी लवकर आवरून कमला राधा सोबत निघाली. आई तू येणार माझ्या शाळेत राधा खुश होऊन बोलली. व्हय तुला सोडून जाइन मग मंदिरात. मग दोघी त्या पारा जवळ आल्या. काय कमला बाई आज इकडे कुठे वाट चुकला मास्तर तिला बघून बोलले तसे कमला म्हणाली,मास्तर एक काम होत तुमच्या कड़े कमला इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली. बोला मग इथे कोणी . मास्तर मी जोगतिन हाय हे तुम्हाला माहित हाय. हो माहित आहे मग काय त्याच. मला वाटते की राधा माझ्या सारखी जोगतिन होऊ नये तीन शिकाव आणि चांगल काही काम कराव. हे तुमचे विचार चांगलेच आहेत की मास्तर म्हणाले. तुम्ही काय मदत करू शकता का माझी हे इचारायला आली मी कमला म्हणाली. हे बघा तुम्ही उद्या तुमच्या वस्ती तिल सगळ्या बायकाना घेवून या मी सगळ्याना समजावून सांगेन की हे देवदासी वैगेरे काही नसते . मास्तर म्हणाले. बर जमेल तितक्या बायाना घेवून येते म्हणत कमला निघाली. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलांची शाळा झाल्या वर कमला आपल्या सोबत आठ दहा जोगतिनी ना घेवून आली. तशी त्यांची वस्ती मोठी होती पण सगळ्याच जणी नाही आल्या. तरी मास्तरानी त्यांना हे जोगतिन म्हणजेच देवदासी असे काही नसते तुमचा फायदा घ्यायचा म्हणून या पुजारी आणि गाव प्रमुखानी ही परम्परा सुरु केली. असे देवा सोबत कोणाचे लग्न लावले जात नाही. तुम्ही शिकलेल्या नाहीत म्हणून तुमचा गैर फायदा ही लोक घेत आहेत निदान तुमच्या मुलाना तरी यात येऊ देवू नका. तुम्ही सगळ्या जणीनी एकत्र येऊन याचा विरोध केला किंवा त्या लोकांची पोलीसात तक्रार केली तरच हे लोक सुधारतील. आणि या विरोधात क़ायदा पण आहे फ़क्त तुम्ही आवज उठवला पाहिजे.अस बरच काही मास्तर बोलले. कमला ला ते पटले पण बकीच्या गप होत्या. दुसऱ्या दिवशी मास्तर आलेच नाहीत. असेच काही दिवस गेले मास्तर गावात दिसलेच नाहीत. कमला ला समजेना काय झाले मास्तर अचानक यायचे का बंद झाले.मग एक दिवस उड़त उड़त कमला ला बातमी समजली की गाव प्रमुखानी मास्तर ला बेदम मारहाण केली कारण तो देवदासीं ना त्याच्या विरुद्ध भड़कवत होता ही खबर त्यांना मिळाली होती. आणि मास्तर ला गावात यायची बंदी घातली होती. आता कमला ला प्रश्न पडला पुढे काय करायचे. ? असेच दोन वर्ष गेली. राधा आता 12 वर्षाची झाली आता तिचे लग्न देवाशी लावून देऊन तिला ही जोगवा मागायला कमला सोबत जावे लागणार हे अटळ होते.तिचे कोणी ऐकनार नव्हते. राधा 14 वर्षाची झाली की हे नराधम तिचा पन भोग घेणार या कल्पनेने कमला घाबरली. नाही मी माझ्या पोरी ला जोगतिन नाही करणार मी आई हाय तिची माझा जीव गेला तरी बी चालल पर मी तिला जोगतिन नाय बनवनार. असा कमला ने मनोमन निश्चय केला.आठ दिवसांनी गाव चा उरुस होता. सकाळ पासून कमला मंदिरात काम करत होती. काम करता करता तिच्या मनात विचार आला की आज सगळा गाव उरूसात दंग असणार . मग आपण रात्रीच राधा ला घेवून हे गाव सोडून गेलो तर पण काय सांगाव त्या लोकांचे खबरी पण आहेत. आपण पकडलो गेलो तर लई हाल करतील आपल हे लोक. पन एकदा गाव ची वेस ओलांडली की मग धोका नाय. सगळ काम झाल्यावर तीने देवाला हाथ जोडले आणि म्हणाली,माझी मदत कर देवा,इतकी वरिस तुझी सेवा केली त्याच फळ समजून माझी मदत कर. माझ्या लेकी ला वाचव या लोका पासून. मी आज माझ्या लेकी साठी एक धाडस करणार हाय माझ्या पाठी उभा रहा. मग कमला घरी आली. राधा आणि ती जेवली. राधा बोलली आई आज उरुस बघायला जायचे का ग. हो पोरी जावू. आणि मला मोठ्या पाळन्यात बसायच बाहुली घ्यायची. व्हय सगळ घेऊ . म्हणत तिच्या शी बोलत बोलत कमला ने दोघांचे कपड़े आणि जरूरी सामान एका पिशवीत भरले. रात्रि सगळा गाव जत्रेत गेला होता. तिची वस्ती पण सामसूम होती. बाहेर कोणी नाही हे बघून कमला राधाला घेवून बाहेर आली आणि दाराला कुलुप लावले. दोघी चालत निघाल्या. आपण जत्रे कड़े गावात नाही चाललो हे बघून राधा बोलली अग आई गाव तर तिकडे आहे मग तू कुठे चाललीस इकड़? राधा चुप एकदम आवाज करू नकोस नन्तर सांगते सगळ आता झपाझप पाय उचल कमला म्हणाली. गावात अंधार सगळा .समोरच काही दिसत नहवत. किर्र अंधार आणि रातकिडयांचा आवाज फ़क्त. आई मला भीती वाटते ग कुठे चाललो आपण राधा बोलली. नको भीवू मी हाय माझा हात घट्ट धर म्हणत कमला जोरात रस्ता कापत निघाली. आणि एकदाची गावाची वेस ओलांडली. तसा तिच्या जीवात जीव आला. मग ती एसटी स्टैंड जवळ आली. एक एस टी लागली होती. ति राधाचा हात धरुन आत चढली. आणि एकदम मागच्या बाका वर जावून बसली जेने करून कोणी गावातले बघू नये म्हणून.राधाला तिने डोक्याल तिची ओढणी बांधली. आई कुठे चाललो आपण राधाने परत विचारले. तुझ्या भल्या साठी हे गाव सोडून निघालो. मी आई हाय तुझी तुझ भल कशात हे मलाच माहित. कमला म्हणाली. मग तिने ही डोक्यावरचा साडी चा पदर घट्ट लपेटुन घेतला. एसटी सुरु झाली ती कुठे निघाली काही ही कमला ला माहित नहवते बस हे गाव सोडून ख़ुप लांब तिला जायचे होते मग किती ही कष्ट करून ती राधाला शिक्षण देणार होती तीच भविष्य चांगल घड़वनार होती. कारण देवदासी असली म्हणून काय झाल कमला सुद्धा एक आईच होती. आता एस टी ने वेग घेतला होता तशी कमला निश्चित झाली. आपल्या आयुष्याची गडद सावली आपल्या लेकी वर नाही पडू दिली याच समाधान तिला होते. एसटी जिथे जाईल तिथे आपले नशीब . असा विचार करत मना पासून देवाला हात जोडले. त्याचे आभार मानले. तर राधा तिच्या मांडी वर झोपी गेली होती. कमला ने तिच्या गालावरुन हात फिरवला. आणि उद्याच्या सुंदर भविष्याचा विचारात गूंग झाली. शेवटी आपल्या मुलीच भल चिंतनारी ती आईच होती..
...संगीता देवकर... प्रिंट & मीडिया रायटर.