काही चुका माझ्याही होत्या....
गव्हाच्या रानात
उनाड वाऱ्यासंग,
आठवणी सैरावैरा
धावत होत्या..
बोचऱ्या थंडीत
सकाळी असाच उभा होतो.
तुझ्या मखमली स्पर्ष्याच्या
संवेदना जाणवत होत्या..
शोधता शोधता मलाच मी
आसमंतात हरवून गेलो,
सावलीत माझ्या ,
सावल्या तुझ्याच होत्या...
मी उगाच बघतो
दूरदूर झाडावरती,
कोरलेल्या छटा खूप
तुझ्याच होत्या...
घोंगवणारी हवा
क्षणभर लुप्त झाली,
रमलो होतो तुझ्यात मी
काही चुका माझ्याही होत्या...
संजय सावळे